*ऊस दर आंदोलनाचे राजकारण, समशेरपूर आयन शुगरचे परिसरास लाभलेले विकासात्मक योगदान आणि सामंजस्याचा मार्ग काढावा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ऊस दर आंदोलनाचे राजकारण, समशेरपूर आयन शुगरचे परिसरास लाभलेले विकासात्मक योगदान आणि सामंजस्याचा मार्ग काढावा*
*ऊस दर आंदोलनाचे राजकारण,समशेरपूर आयन शुगरचे परिसरास लाभलेले विकासात्मक योगदान आणि सामंजस्याचा मार्ग काढावा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यात शेतकरी बांधव यांनी
गेल्या काही दिवसांपासून उसाला योग्य आणि जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी शेतकरी बांधव आक्रमक झाले असून आंदोलन तीव्र झाले आहे. शेतकरी जगला पाहिजे आणि त्यांच्या घामाचे योग्य दाम त्यांना मिळालेच पाहिजे, याबाबत कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, या आंदोलनाच्या नावाखाली आज ज्या पद्धतीने उसाच्या गाड्या रोखून धरल्या जात आहेत आणि शेतीमालाचेआणि ऊस तोड मजुरांचे व वाहन धारकांचे अतोनात नुकसान केले जात आहे, ते पाहून एक गंभीर प्रश्न निर्माण होतो—हे खरोखरच शेतकऱ्यांच्या हिताचे आहे की आंदोलनाच्या आड स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रयत्न आहे?
उसाचा भाव वाढवून मिळावा ही शेतकरी बांधवांची तळमळ पूर्णपणे रास्त आहे. परंतु, साखरेचा अंतिम दर आणि कारखान्याचा 'साखर उतारा' (Sugar Recovery) विचारात घेतल्याशिवाय कारखान्याला सुरुवातीलाच एकतर्फी मोठा भाव जाहीर करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असते, ही वास्तवाची दुसरी बाजू आहे. गेल्या काही वर्षांत जागतिक घडामोडींमुळे इंधन आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. कामगारांची मजुरी द्यावी लागत असते त्यामुळे उसाची वाहतूक आणि कारखाना व्यवस्थापनाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अशा कठीण आर्थिक परिस्थितीत कारखाना चालवणे हे कोणत्याही व्यवस्थापनासाठी मोठी कसरत ठरते. हल्ली जिल्ह्यात लहान मोठे साखर कारखाने सुरू होण्याचा मार्गावर आहेत ऊस तोडणी करणारे शेताचा बांधावर येऊन ठेपली आहेत, त्यांना खाण्या पिण्याची वांदे होत आहेत, ठेकेदारांना मजुरांना खाऊ घालणे आर्थिक बाजू पेलवणे ही एक कठीण समस्या आहे सर्वात आदी आयन शुगर ने ऊस तोडणी करून सदर ऊस कारखान्याचा घशा परंत आणून ठेवला आहे, मालाची नासाडी होत आहे, केन यार्डात वाहने भरून पडली आहेत, ऐन दिवाळीचा सणवार कसा साजरा करणार?मालक चालक त्रस्त झाली आहेत, कुठं तरी हे मार्ग मोकळा झाला पाहिजे, अर्थात समशेरपूर आयन शुगर आणि परिसराचा आर्थिक विकास: एक ऐतिहासिक योगदान या पार्श्वभूमीवर, समशेरपूर येथील आयन शुगर कारखान्याचे परिसराच्या विकासातील योगदान दिले आज, हे विसरून चालणार नाही, आणि अजिबात दुर्लक्षित करता येणार नाही. कोणत्याही ग्रामीण भागाचा कायापालट होण्यासाठी तेथील कृषी आणि औद्योगिक क्षेत्राची प्रगती हातात हात घालून चालणे अत्यंत गरजेचे असते. आयन शुगर कारखान्याने गेल्या अनेक वर्षांत आपल्या परिसराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात जे भरीव योगदान दिले आहे, ते खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आणि दिशादर्शक आहे. कारखान्याने केवळ ऊस गाळप करणारी व्यावसायिक संस्था म्हणून कार्य केलेले नाही, तर तो या संपूर्ण परिसराचा आर्थिक कणा बनून राहिला आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनाला स्थैर्य गेल्या 15 ते 20 वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने जेव्हा आर्थिक अडचणीत सापडले किंवा बंद पडण्याच्या मार्गावर होते, अशा अत्यंत बिकट परिस्थितीतही आयन शुगरने परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप केला. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य वेळी तोडणी मिळणे आणि त्या मोबदल्यात हक्काचे पैसे मिळणे, यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढून कृषी विकासासाठी खऱ्या अर्थाने 'जीवदान' मिळाले.
कृषी आधुनिकीकरण, ऊस उत्पादकता कशी वाढवावी, ठिबक सिंचनाचा वापर कसा करावा, दर्जेदार बियाणे व खते कशी वापरावीत, तसेच माती परीक्षण याबाबत शेतकरी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून परिसरातील शेती अधिक समृद्ध केली. रोजगाराच्या नवीन संधी दिली कारखान्यामुळे हजारो तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळाला. ऊस वाहतूक, ट्रॅक्टर-ट्रक मालक, चालक, हॉटेल व्यवसाय आणि स्थानिक बाजारपेठेला मोठी चालना मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील स्थलांतर थांबले.
पायाभूत सुविधा व सामाजिक उत्तरदायित्व: कारखान्यामुळे परिसरातील रस्ते, दळणवळण, तसेच आरोग्य व शैक्षणिक उपक्रमांना मोठा आधार मिळाला आहे. आयन शुगर ने कृषी विकासाला विकासात्मक चालना दिली आहे नुसतं गाड्या अडवून, आंदोलन करून मार्ग निघणार नाहीत, शेतकरीचा समस्या चे निवारण खऱ्या अर्थाने स्वतः शेत करी करू शकतो,
अडवणूक नव्हे, सामंजस्य गरजेचे
आज मात्र, काही राजकीय स्टंटबाजी आणि अदृश्य स्वार्थापोटी कारखान्याची कोंडी केली जात आहे. गाड्या रोखल्यामुळे शेतात कापून ठेवलेला ऊस वाळून जात आहे, ज्याचा थेट फटका वजन आणि उताऱ्यावर होऊन शेवटी शेतकऱ्यांचेच अतोनात नुकसान होत आहे. विकास साध्य करायचा असेल, तर केवळ अडवणूक आणि हटवादीपणा करून चालत नाही; प्रसंगी एक पाऊल मागे घेऊन सामंजस्याची भूमिका घ्यावी लागते. कारखाना कोणत्याही पक्षाचा किंवा व्यक्तीचा असो, कारखाना सुरू राहणे आणि सुरळीत चालणे हेच शेतकऱ्यांचे खरे जीवनसूत्र आहे. कारखाना बंद पडला किंवा अडचणीत आला, तर त्याचे सर्वात मोठे नुकसान शेवटी शेतकरी भूमीपुत्रांनाच सहन करावे लागेल. म्हणूनच, सर्व पक्ष आणि संघटनांनी राजकीय अजेंड्याच्या बाहेर पडून टेबल टॉकमधून (चर्चेतून) तोडगा काढणे गरजेचे आहे. शेतकरी आणि कारखाना व्यवस्थापन यांनी एकमेवं सयुक्तिक पूरक बनून सामंजस्याने प्रश्न सोडवले, तरच कारखान्याचे अस्तित्व टिकेल, परिसराचा आर्थिक विकास अखंड राहील आणि कृषी विकासाचे चक्र अविरत फिरत राहील. आज गरज आहे ती विनाकारण आंदोलनातून होणारे नुकसान थांबवून विकासाचा समतोल साधण्या साठी आंदोलनाचे एक पाऊल मागे घेऊन सर्वांचा सन्मान आणि आदर्श राहील तरच ही दिवाळी सुखात, आनंदात साजरी होईल.



