*ताम्हाणे फाटा ते मूर सुतारवाडी रस्त्याच्या कामास प्रारंभ,ग्रामस्थांमध्ये समाधान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ताम्हाणे फाटा ते मूर सुतारवाडी रस्त्याच्या कामास प्रारंभ,ग्रामस्थांमध्ये समाधान*
*ताम्हाणे फाटा ते मूर सुतारवाडी रस्त्याच्या कामास प्रारंभ,ग्रामस्थांमध्ये समाधान*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील तळवडे अंतर्गत असलेला ताम्हाणे फाटा ते मूर सुतारवाडी हा मागील वर्षी अपूऱ्या अवस्थेमध्ये राहिलेला रस्ता हा आता दिवाळी पूर्वी चालू झाला आहे. या रस्त्याचे कामकाज रुंदी करण, डांबरी करण, आणि खडीकरण रस्त्याला असलेली साईड पट्टी, गटार लाईन ही परीपूर्ण अवस्थेत करावयाची आहे. गेली दोन तीन वर्षे हा रोड अतिशय खराब अवस्थेमध्ये होता. त्यावर सातत्याने संबधीत बांधकाम खात्याचे लक्ष वेधत घेत निदर्शनास आणून दिले गेले. आमदार किरण सामंत यांना राजापूर शहर यांनी या रस्त्याबद्दल पत्र व्यवहार करून आमदार किरण सामंत यांच्या कडून ह्या रस्त्याला मान्यता मिळवली गेली. आणि आता त्यांच्याच प्रयत्नामुळे मागील वर्षी अपूऱ्या अवस्थे मध्ये राहिलेला रोड आता त्याचे कामकाच लांजा साईराज भिंगार्डे एस, कन्ट्रेशन यांच्या कडे सोपवण्यात आले आहे. मूर सुतारवाडी हा या रोडचा शेवटचा टप्पा असून या रोडवरती आता जणू काही दुपदरीकरच दिसून येईल असे संबोधले जात आहे. कारण रस्त्यासाठी मधली, साईडची सर्व अडचन निघून जात आहे त्यामूळे दुपदरी रस्ता दिसत आहे. रस्त्यासाठी आमदार किरण सामंत यांच्या विशेष प्रयत्नातून रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरण कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तो जर का व्यवस्थितरीत्या रस्ता केला गेला तर अनेक अपघात वाचले जातील यात काय शंका नाही. त्यानुसार या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ झाला आहे. यामुळे विभागातील प्रवासी व जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे. गेली दोन वर्षे हा रस्ता नादुरुस्त अवस्थेत होता. त्यामुळे लोकवर्ग विद्यार्थी, वृद्ध व महिला यांचे प्रचंड हाल होत होते. तसेच चालकांना गाडी चालवताना अनेक अडचनी यायच्या त्यामूळे लहान -मोठ्या अपघातांची मालिका सुद्धा सुरू होती.
राजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे 6 कि.मी. लांबीच्या या रस्त्याचे काम जोरदारपणे सुरू केले असून लवकरच ते डांबरीकरण पूर्ण करावे.व जनतेचे हाल कमी करावे.
या रस्त्याचे कामकाज दर्जेदार व चांगले होण्यासाठी सर्व जनतेने व विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे व चांगल्या प्रकारे रस्ता कसा बनेल याकडे लक्ष द्यावे अशी पंचक्रोशी मधून विनंती आहे.



