ताजा खबरे:
*विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक रुपया गोळा करून स्वयंपाकी मावशींना दिली दिवाळीची साडी भेट*
*राजापूरची गंगा देवस्थान स्वच्छता मोहीम उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न*
*राजापूर पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीसाठी स्वमालकीची जागा मंजूर पालकमंत्री उदय सामंत,आमदार किरण सामंत यांचा सततचा पाठपुरावा यशस्वी*
*ताम्हाणे फाटा ते मूर सुतारवाडी रस्त्याच्या कामास प्रारंभ,ग्रामस्थांमध्ये समाधान*
*ऊस दर आंदोलनाचे राजकारण, समशेरपूर आयन शुगरचे परिसरास लाभलेले विकासात्मक योगदान आणि सामंजस्याचा मार्ग काढावा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*राजापूर पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीसाठी स्वमालकीची जागा मंजूर पालकमंत्री उदय सामंत,आमदार किरण सामंत यांचा सततचा पाठपुरावा यशस्वी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*राजापूर पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीसाठी स्वमालकीची जागा मंजूर पालकमंत्री उदय सामंत,आमदार किरण सामंत यांचा सततचा पाठपुरावा यशस्वी*

  • Share:

*राजापूर पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीसाठी स्वमालकीची जागा मंजूर पालकमंत्री उदय सामंत,आमदार किरण सामंत यांचा सततचा पाठपुरावा यशस्वी*
राजापूर(प्रतिनिधी):-पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून येथील तालुका पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी शासनाची जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्यास महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने मंजुरी दिली आहे. यासंदर्भात 2 नोव्हेंबर 2026 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकिय इमारतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यासाठी राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत व आ. किरण सामंत यांनी सातत्याने शासनस्तरावर प्रयत्न केले होते. यामुळे तालुकावासीयांचे दीर्घ काळाचे स्वप्न साकार होणार आहे. जणू हि दिवाळीची भेट समजली जात आहे. तालुका पंचायत समितीच्या नवीन प्रशासकिय इमारतीसाठी शासनाची जागा विनामुल्य देण्याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल सामंत व आ. सामंत यांनी बावनकुळे यांना विशेष धन्यवाद दिले आहेत. या शासन निर्णयानुसार, राजापूर येथील सर्वे क्रमांक 271/1 मधील एकूण 1.10.10 हेक्टर क्षेत्रापैकी 0.79.01 हेक्टर शासकीय जमीन पंचायत समिती, राजापूर यांना नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी भोगवटादार वर्ग-2 या धारणाधिकाराने विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 तसेच संबंधित नियम आणि शासन अधिसूचनेतील तरतुदींच्या अधीन राहून ही मंजुरी देण्यात आली आहे. महसूल व वन विभागाने शासन ज्ञापन क्र. जमीन-2125/प्र.क्र.257/ज-4अ (ई-1684624) अन्वये 2 नोव्हेंबर, 2026 रोजी हा आदेश जारी केला आहे. मौजे राजापूर येथील स.क्र. 42ब/1चे एकूण क्षेत्र 1.10.10 हे. आर पैकी 0.72.01 हे. आर एवढी शासकीय जमीन पंचायत समिती, राजापूर यांना नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी प्रदान करण्यात आली आहे. ही जमीन ग्राम विकास विभागामार्फत भोगवटादार वर्ग-2 या धारणाधिकाराने, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 4 आणि शासकीय जमिनीचे वितरण नियम 1971 मधील नियम 5, 6 व 50 नुसार भोगाधिकार मूल्यरहित व महसूलमुक्त किंमतीने (विनामूल्य) आणि कब्जेहक्काने देण्यात आली आहे. महसूल विभागाने या जमिनीच्या वापरासाठी विविध अटी व शर्ती निश्चित केल्या आहेत. महसुल विभागाकडून सोमवारी 2 नोव्हेबर रोजी हा निर्णय जारी करण्यात आला आहे. राजापूर तालुका पंचायत समितीची नवीन प्रशासकिय इमारत व्हावी अशी गेली कित्येक वर्षे मागणी आहे. या विभागांतर्गत सर्व प्रशासकिय कार्यालये एकाच छताखाली यावीत व सर्वसामान्य जनतेला आपली कामे एकत्र करणे शक्य व्हावे यासाठी या इमारतीची मागणी होती. यासाठी आमदार किरण सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या ठिकाणी असलेली शासकिय जागा या इमारतीसाठी मिळावी असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. आता अखेर महसूल प्रशासनाने याला मंजूरी दिली आहे. मंजूर जमिनीचा वापर केवळ प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी करणे बंधनकारक राहणार आहे. जमिनीचा मंजूर प्रयोजनाव्यतिरिक्त वापर केल्यास शासनास विनामोबदला परत करावी लागणार आहे. तसेच जमिनीवरील खाणकाम, खनिज पदार्थ आणि संबंधित शासकीय अधिकार अबाधित राहणार आहेत. याशिवाय, जमिनीच्या विकासासाठी नियोजन प्राधिकरणाच्या नियमांचे पालन करणे, शासनाच्या अटी व शर्तींचे लेखी हमीपत्र देणे आणि आवश्यकतेनुसार संबंधित विभागांचे अभिप्राय घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. राजापूर पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी जमीन उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने तालुक्यातील प्रशासकीय कामकाजासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. या निर्णयामुळे राजापूर पंचायत समितीच्या नवीन, सुसज्ज प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे तालुक्यातील नागरिकांना एकाच छताखाली सर्व सेवा मिळण्यास मदत होणार आहे. ना. उदय सामंत व आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश आले असून याबद्दल महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सामंत व आ. सामंत यांनी विशेष धन्यवाद दिले आहेत.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक रुपया गोळा करून स्वयंपाकी मावशींना दिली दिवाळीची साडी भेट*
November, 04 2026
*राजापूरची गंगा देवस्थान स्वच्छता मोहीम उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न*
November, 04 2026
*राजापूर पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीसाठी स्वमालकीची जागा मंजूर पालकमंत्री उदय सामंत,आमदार किरण सामंत यांचा सततचा पाठपुरावा यशस्वी*
November, 04 2026
*ताम्हाणे फाटा ते मूर सुतारवाडी रस्त्याच्या कामास प्रारंभ,ग्रामस्थांमध्ये समाधान*
November, 04 2026
*ऊस दर आंदोलनाचे राजकारण, समशेरपूर आयन शुगरचे परिसरास लाभलेले विकासात्मक योगदान आणि सामंजस्याचा मार्ग काढावा*
November, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज