*माय भारत केंद्रातर्फे ‘विकसित भारत युवा संवाद’ कार्यक्रम संपन्न,मतदानाचे महत्त्व पटवून देत युवकांना लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागाचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माय भारत केंद्रातर्फे ‘विकसित भारत युवा संवाद’ कार्यक्रम संपन्न,मतदानाचे महत्त्व पटवून देत युवकांना लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागाचे आवाहन*
*माय भारत केंद्रातर्फे ‘विकसित भारत युवा संवाद’ कार्यक्रम संपन्न,मतदानाचे महत्त्व पटवून देत युवकांना लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागाचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत माय भारत केंद्र, नंदुरबार यांच्या वतीने एम. के. डी. कॉलेज ऑफ फार्मसी येथे 2 नोव्हेंबर रोजी ‘विकसित भारत युवा संवाद – आपले मत जाणून घ्या’ (Viksit Bharat Yuva Samvaad – Know Your Vote) कार्यक्रम संपन्न झाला. युवकांमध्ये लोकशाही मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करणे, मतदानाचे महत्त्व पटवून देणे आणि लोकशाही प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढविणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. माय भारत केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी भूषण पाटील यांनी प्रास्ताविकातून माय भारतच्या विविध उपक्रमांची माहिती देत युवकांनी राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. संतोष महाजन, डॉ. ओम सुगंधी, डॉ. अधिकार बोरसे, यशवंत हिरे आणि पवन नाईक उपस्थित होते.
कार्यक्रमात लोकशाही शपथ घेण्यात आली. युवा आयकॉन कमलेश सोनवणे यांनी मतदानाचे महत्त्व, मतदारांचे अधिकार व कर्तव्ये तसेच लोकशाही प्रक्रियेतील युवकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. युवा संवाद सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपले विचार मांडले. यावेळी युवकांना माय भारत पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तसेच QR कोडच्या माध्यमातून सूचना व अभिप्राय नोंदविण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
‘आपले मत हाच आपला आवाज आहे आणि जागरूकतेने दिलेले मत देशाच्या उज्ज्वल भविष्याची दिशा ठरवू शकते,’ हा संदेश या कार्यक्रमातून युवकांना देण्यात आला. अशी माहिती माय भारत केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी भूषण पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.



