*जिल्ह्यात रोजगार हमीची 12 हजार 283 कामे सुरू, 22 हजार 633 मजुरांना रोजगार,स्थलांतर रोखण्यासाठी प्रशासनाच्या उपाययोजना*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्ह्यात रोजगार हमीची 12 हजार 283 कामे सुरू, 22 हजार 633 मजुरांना रोजगार,स्थलांतर रोखण्यासाठी प्रशासनाच्या उपाययोजना*
*जिल्ह्यात रोजगार हमीची 12 हजार 283 कामे सुरू, 22 हजार 633 मजुरांना रोजगार,स्थलांतर रोखण्यासाठी प्रशासनाच्या उपाययोजना*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासह रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासना मार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) योजना अंतर्गत जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील 643 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 12 हजार 283 कामे सुरू असून, या कामांच्या माध्यमातून 22 हजार 633 मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
तालुकानिहाय सुरू असलेली कामे व मजुरांची उपस्थिती पुढीलप्रमाणे आहे. अक्कलकुवा तालुक्यातील 78 ग्रामपंचायतींमध्ये 8 हजार 998 कामे सुरू असून 5 हजार 231 मजूर उपस्थित आहेत. अक्राणी तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींमध्ये 1 हजार 486 कामे सुरू असून 3 हजार 636 मजूर, नंदुरबार तालुक्यातील 137 ग्रामपंचायतींमध्ये 2 हजार 441 कामे सुरू असून 3 हजार 853 मजूर, नवापूर तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींमध्ये 2 हजार 51 कामे सुरू असून 4 हजार 90 मजूर, शहादा तालुक्यातील 149 ग्रामपंचायतींमध्ये 2 हजार 327 कामे सुरू असून 3 हजार 604 मजूर, तर तळोदा तालुक्यातील 65 ग्रामपंचायतींमध्ये 980 कामे सुरू असून 2 हजार 219 मजूर उपस्थित आहेत. जिल्ह्यातील 643 ग्रामपंचायतींपैकी 631 ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरू असून, उर्वरित 12 ग्रामपंचायतींमध्ये सध्या एकही काम सुरू नाही. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, स्थानिक मजुरांना त्यांच्या गावाजवळच काम मिळावे आणि दुष्काळामुळे उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी त्यांना मदत व्हावी, या उद्देशाने रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत विविध विभागांच्या समन्वयातून गावोगावी सार्वजनिक तसेच वैयक्तिक लाभाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
या योजनेंतर्गत कृषी विभागामार्फत फळबाग लागवडीची 168 आणि कंपार्टमेंट बंडिंगचे 1 काम सुरू आहे. वन विभागामार्फत रोपवन 60, रोपवाटिका 6, एलबीएस 3 आणि सीसीटीचे 1 काम सुरू आहे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवडीची 57, वृक्षलागवडीची 4 आणि रोपवाटिकांची 6 कामे सुरू आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्यांची 64 आणि पेव्हर ब्लॉकची 3 कामे सुरू आहेत. ग्रामपंचायतींमार्फत घरकुलांची 11 हजार 317, बांबू लागवडीची 248, सिंचन विहिरींची 191, रस्त्यांची 19, वृक्षलागवडीची 24, पेव्हर ब्लॉकचे 1, अस्तरीकरण शेततळ्यांची 10, गुरांच्या गोठ्यांची 10, जलतारा शोषखड्ड्यांची 10, शेळीपालन शेडची 6, अंगणवाडीची 2 आणि गाळ काढण्याचे 1 काम सुरू आहे. तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत रस्त्यांची 57, पेव्हर ब्लॉकची 14 आणि इतर विविध कामांचा समावेश आहे. ग्रामीण मजुरांचे रोजगारासाठी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने ‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्षा’ हेल्पलाईन क्रमांक (02564) 299544 कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामस्थास किंवा मजूर बांधवास रोजगाराची आवश्यकता असल्यास अथवा रोजगाराशी संबंधित अडचण असल्यास ‘मुळवाट स्थलांतर नियंत्रण कक्षा’च्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.



