*दुष्काळग्रस्त मजुरांच्या मदतीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा पुढाकार,25 हजार मजुरांना दिवाळी शिधा किटचे वाटप, 5 नोव्हेंबर रोजी नंदुरबार येथे शिधा किट वितरणाचा शुभारंभ, जिल्ह्यातील रोजगà
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दुष्काळग्रस्त मजुरांच्या मदतीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा पुढाकार,25 हजार मजुरांना दिवाळी शिधा किटचे वाटप, 5 नोव्हेंबर रोजी नंदुरबार येथे शिधा किट वितरणाचा शुभारंभ, जिल्ह्यातील रोजगà
*दुष्काळग्रस्त मजुरांच्या मदतीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा पुढाकार,25 हजार मजुरांना दिवाळी शिधा किटचे वाटप, 5 नोव्हेंबर रोजी नंदुरबार येथे शिधा किट वितरणाचा शुभारंभ, जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेवरील मजुरांना मिळणार दिवाळी भेट*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या सुमारे 25 हजार कष्टकरी मजुरांना दिवाळीनिमित्त शिधा किट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. या उपक्रमाच्या वितरणाचा शुभारंभ 5 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता सेंट मदर टेरेसा स्कूल, नंदुरबार येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत दिलीप मोरे यांनी दिली. 29 ऑक्टोबर 2026 रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नंदुरबार जिल्ह्याचा दौरा करून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला होता. या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील पाणीटंचाई, रोजगाराची परिस्थिती, ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी तसेच रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांच्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या.
दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील कष्टकरी कुटुंबांवर निर्माण झालेला आर्थिक ताण लक्षात घेऊन दिवाळीच्या सणात या कुटुंबांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने पालकमंत्री मुश्रीफ यांनी शिधा किट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या दिवाळी शिधा किटमध्ये प्रत्येकी एक किलो रवा, बेसन पीठ, साखर, खाद्यतेल व पोहे अशा पाच जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेवर कार्यरत असलेल्या सुमारे 25 हजार नोंदणीकृत मजुरांपर्यंत ही मदत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने होणार वितरण, या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्राम रोजगार सेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बूथ लेव्हल एजंट (बीएलए) यांच्या संयुक्त सहकार्याने शिधा किट वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे.5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता सेंट मदर टेरेसा स्कूल, नंदुरबार येथे आयोजित कार्यक्रमातून संबंधित ग्राम रोजगार सेवक व कार्यकर्त्यांना शिधा किट वितरणाबाबत आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत. त्यानंतर आपापल्या कार्यक्षेत्रातील पात्र व नोंदणीकृत रोजगार हमी योजनेवरील मजुरांपर्यंत ही मदत पोहोचविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते,लोकप्रतिनिधी, जिल्हा व तालुका पदाधिकारी, शहराध्यक्ष, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, बूथ कार्यकर्ते, बीएलए तसेच जिल्ह्यातील सर्व ग्राम रोजगार सेवक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी केले आहे.“दुष्काळाच्या संकटात कष्टकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी लोकसेवा—हसन मुश्रीफ.,“नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वाधिक अडचणींचा सामना ग्रामीण भागातील कष्टकरी व रोजगार हमी योजनेवरील मजुरांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दिवाळीच्या सणात त्यांच्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.जिल्ह्यातील सुमारे 25 हजार मजुरांपर्यंत ही मदत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. या उपक्रमाच्या यशस्वी अंमल बजावणीसाठी सर्व संबंधितांनी सहकार्य करावे व एकही पात्र मजूर या मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही डॉ. मोरे यांनी केले आहे.



