*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये फ्रेशर्स पार्टी उत्साहात साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये फ्रेशर्स पार्टी उत्साहात साजरी*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये फ्रेशर्स पार्टी उत्साहात साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी फ्रेशर्स पार्टीचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, संगीत आणि मनोरंजनात्मक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मिस फ्रेशर म्हणून श्रेया रामराजे हिची, तर मिस्टर फ्रेशर म्हणून सुमित मोरे याची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी समुद्रे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन रसना पाटील, रोहिणी पटेल आणि पूजा गायकवाड यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नवीन विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्षा योगिता गणेश पाटील आणि सचिव गणेश गोविंद पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आनंदी व उत्साही वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.



