*बिरसा मुंडा यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी सदैव कटिबद्ध,मुंबईतील जनजातीय गौरव दिन कार्यशाळेत माजी खासदार डॉ.हिना गावित यांनी मांडले विचार, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाची महाराष्ट्à¤
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बिरसा मुंडा यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी सदैव कटिबद्ध,मुंबईतील जनजातीय गौरव दिन कार्यशाळेत माजी खासदार डॉ.हिना गावित यांनी मांडले विचार, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाची महाराष्ट्à¤
*बिरसा मुंडा यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी सदैव कटिबद्ध,मुंबईतील जनजातीय गौरव दिन कार्यशाळेत माजी खासदार डॉ.हिना गावित यांनी मांडले विचार, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकीतही दिला सहभाग*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महान स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांचे महान कार्य गावा गावातल्या प्रत्येक आदिवासी घरापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजातीय गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित सर्व कार्यक्रम यशस्वी करूया. भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष, त्याग आणि स्वाभिमानाचा वारसा जपत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य करण्यास आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, असे विचार माजी खासदार तथा भाजपाच्या जनजातीय गौरव समितीच्या सहसंयोजक डॉक्टर हिना गावित यांनी व्यक्त केले. भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात आयोजित ‘जनजातीय गौरव दिन कार्यशाळा’ तसेच भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक 3 नोव्हेंबर 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. त्याप्रसंगी डॉक्टर हिना गावित यांनी कार्यशाळेत मनोगत मांडताना हे विचार व्यक्त केले. या प्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश सह संघटनमंत्री सतीश धोंडजी, खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, आमदार संजय पुराम, आमदार राजेश पाडवी, महाराष्ट्र राज्य जनजाती आघाडीच्या उपाध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, संतोष जनाटे, विरेंद्र शहा आदी मान्यवर उपस्थित होते. आदिवासी समाजाची वज्रमूठ उभारत ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र क्रांतीचे नेतृत्व करणारे महान स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या महान कार्याचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 15 नोव्हेंबर हा दिवस ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. भगवान बिरसा मुंडा यांचा शौर्यशाली इतिहास आणि प्रेरणादायी विचार जनमानसापर्यंत पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे; असे विचार या प्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी प्रमुख मार्गदर्शनात व्यक्त केले. भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष, त्याग आणि स्वाभिमानाचा वारसा जपत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच समाजाचे हक्क, अधिकार आणि सांस्कृतिक अस्मितेच्या जतनासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश सह संघटनमंत्री सतीश धोंडजी, खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, आमदार संजय पुराम आधी मान्यवरांच्या हस्ते आदिवासी वीर पुरुषांच्या प्रतिमेचे तसेच भारत माता प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच छोटेखानी चित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.



