*नंदुरबार जिल्हास्तर युवा महोत्सव 2026-27 जिल्हा, विभाग,राज्य व राष्ट्रीयस्तरावर युवामहोत्सवाचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हास्तर युवा महोत्सव 2026-27 जिल्हा, विभाग,राज्य व राष्ट्रीयस्तरावर युवामहोत्सवाचे आयोजन*
*नंदुरबार जिल्हास्तर युवा महोत्सव 2026-27 जिल्हा, विभाग,राज्य व राष्ट्रीयस्तरावर युवामहोत्सवाचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार व्दारा युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढिस लागणे यासाठी प्रतिवर्षी जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीयस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार आयोजन करते. राज्यात सन 2026-27 या वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सवाचे रुपांतर Vikasit Bharat Young Leaders Dialogue मध्ये करण्यात आलेले आहे.त्याअनुषंगाने 15 ते 29 या वयोगटातील युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सन 2026-27 या वर्षाचे जिल्हास्तरीय महोत्सवाचे आयोजन 27 ते 28 नोव्हेंबर, 2026 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, खामगांव रोड, नंदुबार येथील बॅडमिंटन (इनडोअर हॉल) येथे करण्यात आलेले असून, सदर युवा महोत्सव "Nasha Mukt Yuva for Viksit Bharat" या संकल्पनेवर आधारीत राहणार आहे. सदर जिल्हास्तर युवा सांस्कृतीक महोत्सवामध्ये समुह लोकनृत्य (7+3 सहाय्यक कर्मचारी) व समुह लोकगित (7+3 सहाय्यक कर्मचारी), पथनाट्य (सहभागी संख्या 10), चित्रकला (2), कविता लेखन स्पर्धा (1) असे एकूण 33 चा समुह जिल्हास्तरावरुन विभागस्तरावर तसेच याप्रमान राज्य व राष्ट्रीयस्तरापर्यंत निवड होणार आहे. यासाठी कलाकाराचे/सहकलाकार/साथसंगत देणारे यांचे 15 ते 29 वर्ष वयोगटातील युवक व युवती सहभागी होवु शकतील. (दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी वयाची परिगणना 15 ते 29 वर्ष अशी असावी) आपले विहित नमुण्यातील प्रवेश अर्ज 20 नोव्हेंबर 2026 रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, खामगांव रोड, नंदुरबार येथे किंवा dsondb@gmail.com या ईमेलवर ऑनलाईन सादर करण्यात यावे. तसेच इलेट्रॉनिक्स वाद्य उदा. सिंथेसाईझार ई. स्पर्धात्मक प्रकारामध्ये वापरण्यास परवानगी नाही. तसेच लोकनृत्यासाठी रेकॉर्ड केलेले संगीत (टेप, सीडी, पेनड्रॉईव्ह इ.) वापरण्यास परवानगी दिली जाणार नाही.
तरी नंदुरबार जिल्ह्यातील कृषी महाविद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ माहाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महिला व युवक मंडळ, विविध कला व क्रीडा मंडळे या इच्छुक कलावंतांनी / स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्रीमती कविता नावंदे- निंबाळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी नंदुरबार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मिनल थोरात (राज्य क्रीडा मार्गदर्शक), मो. नं. 8625946709 यांच्याशी संपर्क करावा.



