*जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण, पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय रोलर हॉकी स्पर्धेत जळगाव जिल्ह्याची दुहेरी पदकांची कमाई*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण, पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय रोलर हॉकी स्पर्धेत जळगाव जिल्ह्याची दुहेरी पदकांची कमाई*
*जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण, पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय रोलर हॉकी स्पर्धेत जळगाव जिल्ह्याची दुहेरी पदकांची कमाई*
जळगाव(प्रतिनिधी):-30 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दरम्यान पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय रोलर हॉकी स्पर्धेत जळगाव जिल्ह्याची दुहेरी पदकांची कमाई! साई स्केटिंग अकॅडमी चाळीसगावच्या खेळाडूंनी जळगाव जिल्ह्याच्या संघातून खेळताना जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे, राज्यस्तरीय रोलर हॉकी स्पर्धेत आपल्या जळगाव जिल्ह्याच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत दोन पदकांवर आपले नाव कोरले आहे, 12 वर्षे आतील कॅडेट मुले – सुवर्णपदक विजेते निखिल गवळी गोलकीपर, विहान परदेशी, विवेक कोतकर, क्षितिज शेजवळकर, उत्कर्ष जोशी, सर्वज्ञ पाटील, कॅडेट मुलांनी उत्कृष्ट खेळ, सांघिक भावना, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शानदार कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे, 15 वर्षे आतील सब- ज्युनियर मुले – कांस्यपदक विजेते निकुंज जैन गोलकीपर, भावेश कुशवाहा, आदित्य जोशी, कुश गुप्ता, मल्हार सोनवणे, आर्यन पाटील,
सब-ज्युनियर मुलांनीही अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कांस्यपदक पटकावले, दोन्ही संघांनी आपले सर्वोत्तम प्रदर्शन करत जळगाव जिल्ह्याचा मान अभिमानाने उंचावला आहे. दोन्ही संघांतील खेळाडूंना प्रशिक्षक सुनील शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले सर्व खेळाडू पालक आणि या यशासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.



