*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये इंडक्शन कार्यक्रम उत्साहात साजरा
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये इंडक्शन कार्यक्रम उत्साहात साजरा
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये इंडक्शन कार्यक्रम उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी इंडक्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून नवागत विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची ओळख करून देण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास, सांघिक भावना आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शैक्षणिक शिस्त, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञान न मिळवता व्यावहारिक कौशल्ये, संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासावरही भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सामुद्रे यांनी प्रभावीपणे केले. इंडक्शन कार्यक्रमांतर्गत अभ्यासक्रमाची ओळख प्रा. हर्षल पाटील आणि प्रा. याकूब पाशा यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची रचना, विषयांचे स्वरूप, परीक्षा पद्धती, शैक्षणिक उपक्रम आणि फार्मसी शिक्षणातील विविध संधी यांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापिका रसना पाटील, रोहिणी पटेल आणि पूजा गायकवाड यांनी केले. त्यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या कार्यक्रमामुळे नवागत विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाची सकारात्मक सुरुवात करण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता गणेश पाटील, सचिव गणेश गोविंद पाटील आणि प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांनी कौतुक केले. तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रम आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



