*प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी 13 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ,अंतिम मतदार यादी 30 नोव्हेंबर प्रसिद्ध होणार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी 13 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ,अंतिम मतदार यादी 30 नोव्हेंबर प्रसिद्ध होणार*
*प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी 13 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ,अंतिम मतदार यादी 30 नोव्हेंबर प्रसिद्ध होणार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत निवडणूक आयोगाने विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 31 ऑगस्ट, 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीसाठी दावे व हरकती सादर करण्याच्या मुदतीत 13 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या 29 ऑक्टोबरच्या निर्देशानुसार, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करणे तसेच त्यांच्या निपटारा करण्याच्या मुदतीत सुधारणा करण्यात आली आहे. आता नागरिकांना 13 नोव्हेंबर, 2026 पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. नोटीस टप्पा व दावे-हरकतींचा निपटारा करण्याची मुदत 25 नोव्हेंबर, 2026 पर्यंत राहील. तर अंतिम मतदार यादी 30 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक, मतदार, राजकीय पक्ष आणि संबंधित यंत्रणेने या सुधारित वेळापत्रकानुसार नोंदणी व इतर प्रक्रिया वेळेत पूर्ण करुन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी केले आहे.



