*पत्नीस मारहाण करणाऱ्या पतीस समजविण्यासाठी गेलेल्या महिलेला जिवेठार मारणाऱ्या पतीस न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा व 20 हजारांचा दंड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पत्नीस मारहाण करणाऱ्या पतीस समजविण्यासाठी गेलेल्या महिलेला जिवेठार मारणाऱ्या पतीस न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा व 20 हजारांचा दंड*
*पत्नीस मारहाण करणाऱ्या पतीस समजविण्यासाठी गेलेल्या महिलेला जिवेठार मारणाऱ्या पतीस न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा व 20 हजारांचा दंड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहादा पोलीस ठाण्याचे हद्दीतील फिर्यादी नामे मुरसिंग तिरसिंग भिल, वय-57, रा. शिरुड दिगर ता. शहादा, जि. नंदुरबार हे पत्नी कोकीला व नातू गणेश देवानंद भिल यांचेसह शिरुड दिगर येथे वास्तव्यास आहेत. मुरसिंग हे शेतमजूरीचे कामे करुन परिवाराचा उदर निर्वाह करीत होते. 1 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी मुरसिंग भिल यांचेकडेस त्यांचा नातेवाईक असलेला श्रीराम काळु ऊर्फ काल्या शेवाळे (वाघे), रा. कुढावद, ता. शहादा, जि. नंदुरबार हा त्याची पत्नी सिंधूबाई व 2 लहान मुलांसह शिरुड दिगर येथे पाहुणा म्हणून आला होता. श्रीराम यास रात्रीच्या जेवणाचा पाहुणचार केलेनंतर मुरसिंग भिल हे रात्री 9 वाजता मालकाचे शेतात ऊसाला पाणी भरण्याकरीता जात असतांना श्रीराम हा त्याची पत्नी सिंधुबाईस सांगत होता की, "आपण बाहेरगावी मजुरी कामासाठी जावूया." त्यावेळी सिंधुबाई हिने बाहेरगावी कामाला जायचे नाही म्हणत श्रीराम यास नकार दिला होता. त्यावरुन दोघा पती-पत्नीत वाद निर्माण झाल्याने फिर्यादी मुरसिंग यांनी दोघांची समजुत काढत वाद शांत केला होता. फिर्यादी मुरसिंग भिल हे दुसऱ्या दिवशी 2 डिसेंबर 2020 रोजी पहाटे 5.15 वाजताचे सुमारास शेतातून घराकडे येत असतांना त्यांना सावळदा रस्त्यावर त्यांची मुलगी रंजना भेटली व तिने वडील मुरसिंग यांना निरोप दिला की, श्रीराम शेवाळे हा आई कोकीला हिस मारहाण करीत आहे. म्हणून तुम्हाला घेणेकरीता गणेश व टिकाराम हे शेताकडे गेले आहेत. त्याचवेळी मुरसिंग यांचेजवळ नातू गणेश व गावातील टिकाराम असे मोटारसायकलीवरुन आले व सांगितले की, "श्रीराम हा त्याची पत्नी सिंधुला पहाटे 05.00 वाजेपासून मारहाण व शिवीगाळ करत होता. म्हणून कोकीलाबाई ही सिंधुला मारहाण करु नको, असे श्रीराम शेवाळे यास समजविण्यास गेली असता सदर गोष्टीचा श्रीराम यास राग आल्याने कोकीलाबाईस शिवीगाळ करत घरातील लाकडी थापीने जोर- जोराने मारहाण करीत आहे." असे कळाल्यावर फिर्यादी मुरसिंग हे तात्काळ घरी आले असता त्यांनी पाहीले की, श्रीराम शेवाळे हा कोकीलाबाईस लाकडी थापीने तिच्या डोक्यावर मारहाण करत होता व कोकीलाबाई ही बचावाकरीता हात आडवे करीत होती. त्यामुळे फिर्यादी मुरसिंग यांनी पत्नी कोकीलाबाई हिस श्रीराम शेवाळे याच्या ताब्यातून सोडविण्याचा प्रयत्न केला असता श्रीराम हा मुरसिंग व त्यांचे सोबत असलेल्या इसमांवर धावून येत होता. त्यानंतर श्रीराम हा मुरसिंग यांच्या घरातून पळून जाण्याचा प्रयत्नात असतांना फिर्यादी मुरसिंग, त्यांचा नातू गणेश, गावातील इसम टिकाराम व काही नागरीकांनी श्रीराम यास पकडले होते. फिर्यादी मुरसिंग यांच्या पत्नी कोकीलाबाईस आरोपी श्रीराम
शेवाळे याचेकडून गंभीर मारहाण झाल्याने त्या घरातील पलंगावर जखमी अवस्थेत पडलेल्या होत्या. त्यामुळे नातेवाईकांचे मदतीने कोकीलाबाई यांना शहादा येथील सार्थक हॉस्पिटल येथे उपचाराकरीता दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी कोकीलाबाईस तपासून त्या मयत झाल्याचे फिर्यादी मुरसिंग यांना सांगितले होते. सदर घटनेबाबत शिरुड दिगर गावाचे सरपंच सुकलाल लक्ष्मण भिल यांनी पोलीसांसोबत संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली होती. त्यावरुन शहादा पोलीस स्टेशन येथे आरोपो श्रीराम काळु ऊर्फ काल्या शेवाळे (वाघे) विरुध्द गु.र.नं. 928/2020, भा.द.वि. कलम 302, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास शहादा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी एम. रमेश (L.P.S.) यांनी केला असून आरोपी नामे श्रीराम काळु ऊर्फ काल्या शेवाळे (वाघे), वय 32, रा. कुढावद, ता. शहादा जि. नंदुरबार यास तात्काळ अटक करत अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने सदर गुन्हयाचा तपास करुन महत्वाचे पुरावे जमा केले होते व आरोपीविरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र अति. जिल्हा सत्र न्यायालय, शहादा येथे सादर केले होते. सदर खटल्याची सुनावणी अति. सत्र न्यायाधीश-1, शहादा अ. वि. गुजराथी यांचे समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, डॉक्टर साक्षीदार, तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन सबळ पुराव्याचे आधारे आरोपी श्रीराम काळु ऊर्फ काल्या शेवाळे (वाघे) विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने त्यास अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश-1, शहादा अ. वि. गुजराथी, यांनी भा.द.वि.क.- 302 अन्वये दोषी ठरवत जन्मठेप व 20,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाचे वतीने अति. सरकारी अभियोक्ता अॅड. यशवंतराव बी. मोरे यांनी पाहिले असून मुख्य पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि योगिता राठोड, पोउपनि/विनोद पाटील, शहादा पोलीस ठाणे तसेच पैरवी अंमलदार पो.हे. कॉ. गणेश साबळे, पो.कॉ. देविदास सुर्यवंशी,पो.हे.कॉ /प्रविण पटेल, पो. हे.कॉ शैलेंद्र जाधव यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी तसेच अति. सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहादा गुलाबराव पाटील यांनी अभिनंदन केले आहे.



