*साधना विद्यालयाने रचला इतिहास, शनिमांडळ गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा, नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावर भरारी, हॅमर थ्रोमध्ये हरीश ठाकरेची राज्यस्तरावर झेप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*साधना विद्यालयाने रचला इतिहास, शनिमांडळ गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा, नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावर भरारी, हॅमर थ्रोमध्ये हरीश ठाकरेची राज्यस्तरावर झेप*
*साधना विद्यालयाने रचला इतिहास, शनिमांडळ गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा, नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावर भरारी, हॅमर थ्रोमध्ये हरीश ठाकरेची राज्यस्तरावर झेप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शनिमांडळ येथील गुणवंत विद्यार्थी हरीश गोकुळ ठाकरे याने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत शाळेसह संपूर्ण शनिमांडळ गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून पहिल्यांदा हॅमर थ्रो मध्ये राज्यावर जाणारा पहिला विद्यार्थी हरीश याने हातोडा फेक (हॅमर थ्रो) या मैदानी क्रीडा प्रकारात नाशिक विभागीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. त्याच्या या ऐतिहासिक यशामुळे साधना विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एका मानाच्या अध्यायाची भर पडली आहे.
मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावर झेप घेणाऱ्या हरीशच्या या कामगिरीमुळे शाळेत आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन आमदार चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, सचिव बी. के. पाटील, कार्यालयीन अधीक्षक पुष्पेन्द्र रघुवंशी, शाळेचे प्राचार्य कुंदन पाटील, पर्यवेक्षक पी. यू. आव्हाड, क्रीडा शिक्षक पी. पी. शिरसाट, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हरीशचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड क्रीडा गुणवत्ता दडलेली असते, हे हरीशने आपल्या यशातून सिद्ध केले आहे. त्याची ही यशस्वी झेप साधना विद्यालयातील तसेच परिसरातील इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.



