*महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी निमित्त, अल्पसंख्याक विकास विभागाचे विविध उपक्रम, मदरशांमध्ये शैक्षणिक सप्ताह,वसतिगृहांत ग्रंथ कोपरा व निबंध वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी निमित्त, अल्पसंख्याक विकास विभागाचे विविध उपक्रम, मदरशांमध्ये शैक्षणिक सप्ताह,वसतिगृहांत ग्रंथ कोपरा व निबंध वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन*
*महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी निमित्त, अल्पसंख्याक विकास विभागाचे विविध उपक्रम, मदरशांमध्ये शैक्षणिक सप्ताह,वसतिगृहांत ग्रंथ कोपरा व निबंध वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त (द्विजन्मशताब्दी वर्ष) अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक समाजातील महिला, विद्यार्थी व नागरिकांपर्यंत महात्मा फुले यांचे विचार पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानुसार अल्पसंख्याक विकास विभागामार्फत महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याची माहिती देणाऱ्या रील्स व व्हिडिओ क्लिप तयार करून विभागाच्या संकेतस्थळावर तसेच समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत मदरशांमध्ये विज्ञान, गणित व वाचन स्पर्धांचे आयोजन करून 'महात्मा फुले शैक्षणिक सप्ताह' साजरा करण्यात येणार आहे.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमध्ये मराठी, उर्दू व हिंदी भाषेतील महात्मा फुले यांचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी 'महात्मा फुले ग्रंथ कोपरा' स्थापन करण्यात येणार आहे. हा उपक्रम 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत सुरू करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये 23 ते 27 नोव्हेंबर 2026 या कालावधीत 'सत्यशोधक विचार' विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धांतील विजेत्यांना 11 एप्रिल 2027 रोजी महात्मा फुले जयंतीदिनी पारितोषिके देण्यात येतील.
महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत महात्मा फुले यांच्या 'गुलामगिरी' आणि 'शेतकऱ्याचा आसूड' या निवडक ग्रंथांचा उर्दू अनुवाद करून त्यांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. याशिवाय अल्पसंख्याक समाजातील विधवा महिलांच्या पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत देणे तसेच महिलांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री व साधनसामग्री खरेदीकरिता अनुदान देण्याच्या नवीन योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या उपक्रमांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी हे उपक्रम 11 एप्रिल 2027 पूर्वी पूर्ण करावेत. तसेच उपक्रमांची छायाचित्रे व खर्चाच्या तपशिलासह प्रगती अहवाल दर महिन्याच्या 3 तारखेपर्यंत सादर करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. अंतिम एकत्रित अहवाल 30 एप्रिल 2027 पर्यंत सादर करावयाचा आहे.



