*रायपाटण येथील खाडे वाडीतील 24 कुटुंबांनी स्व खर्चाने सुरु केली घरोघरी नळपाणी योजना*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रायपाटण येथील खाडे वाडीतील 24 कुटुंबांनी स्व खर्चाने सुरु केली घरोघरी नळपाणी योजना*
*रायपाटण येथील खाडे वाडीतील 24 कुटुंबांनी स्व खर्चाने सुरु केली घरोघरी नळपाणी योजना*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे रायपाटण येथील खाडे वाडीतील 24 कुटुंबांना गेली अनेक वर्षे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत होते हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल भटकावे लागत असल्याने एप्रिल मे महिन्यात तर संपूर्ण दिवस पाणी आणण्यात जात होता. सरकारी योजनेची वाट पाहून ग्रामस्थ कंटाळले मग पाण्याची ही भेडसावणारी समस्या कायमस्वरूपी निकालात काढण्याच्या हेतूने टंचाईग्रस्त 24 कुटुंबांनी एकत्र येऊन स्वतःच्या हिमतीवर आणि स्व खर्चाने नळपाणी योजना सुरु केली त्याकरिता वाडीत विहिर पाडून त्यातून पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणाऱ्या 24 कूटुंबाच्या घरी नळ जोडणी करत मुबलक प्रमाणात स्वच्छ पाण्याचा प्रवाह सुरु केला याकामी ग्रामस्थ भरत शिंदे, राज खाडे, अनंत शिंदे आणि ग्रामस्थ, महिला वर्ग यांनी महत्त्वाचे योगदान दिले पाण्याची ही मुलभूत समस्या एकजुट आणि परस्परातील सहकार्याने सोडविणाऱ्या या 24 कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



