*दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर, भारतीय डाक विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा उपलब्ध*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर, भारतीय डाक विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा उपलब्ध*
*दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर, भारतीय डाक विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा उपलब्ध*
नंदुरबार(प्रतिनिधी):-धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील नागरिकांनी परदेशातील आपल्या प्रियजनांना दिवाळी फराळ पाठविण्यासाठी भारतीय डाक विभागाच्या सुरक्षित, किफायतशीर व विश्वासार्ह सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवर डाक अधीक्षक, धुळे विभाग, संजय ताठे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.दीपावलीच्या पावन पर्वानिमित्त परदेशात वास्तव्यास असलेल्या कुटुंबीय, नातेवाईक व आप्तेष्टांना दिवाळी फराळ तसेच इतर अनुज्ञेय वस्तू पाठविण्यासाठी डाक विभागाची आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा धुळे विभागातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश असलेल्या धुळे विभागात 56 डाक कार्यालये व 453 शाखा डाक कार्यालये, असे विस्तृत जाळे कार्यरत आहे. या व्यापक डाक जाळ्याच्या माध्यमातून नागरिकांना विविध डाक सेवा त्यांच्या नजीकच्या डाक कार्यालयातून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मागील वर्षीही धुळे विभागातील डाक कार्यालयांमार्फत आंतरराष्ट्रीय पार्सल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. अनेक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन परदेशातील आपल्या प्रियजनांना दिवाळी फराळ पाठविला आणि भारतीय सणांची परंपरा व आपुलकीची भावना सातासमुद्रापार पोहोचविली.
पोस्टाची आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा ही सुरक्षित, विश्वासार्ह व किफायतशीर आहे. खासगी कुरिअर सेवांच्या तुलनेत माफक दरात पार्सल परदेशात पाठविण्याची सुविधा भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून पोस्टाद्वारे नागरिकांना उपलब्ध आहे. दिवाळीच्या कालावधीत आपल्या प्रियजनांपासून दूर असलेल्या नागरिकांसाठी ही सेवा "घरच्या दिवाळीचा फराळ परदेशातील आपल्या प्रियजनांपर्यंत" पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम ठरेल. आंतरराष्ट्रीय पार्सल बुक करण्यासाठी नागरिकांनी आपल्या नजीकच्या डाक कार्यालयास भेट द्यावी. बुकिंगसाठी प्रेषक व प्राप्तकर्त्याचा संपूर्ण पत्ता, पिन/पोस्टल कोड व मोबाईल क्रमांक उपलब्ध करून द्यावा. पार्सलमध्ये केवळ परदेशात पाठविण्यास अनुज्ञेय असलेल्या वस्तूंचाच समावेश करावा. CN 22 घोषणापत्र (Customs Declaration) अचूक व परिपूर्ण भरावे. त्यामध्ये पार्सलमधील वस्तूंचे वर्णन, संख्या, वजन व मूल्य स्पष्टपणे नमूद करावे. वस्तूंचा HSN कोड (Harmonised System Nomenclature) योग्यरीत्या नमूद करावा गंतव्य देशाच्या नियमांनुसार काही वस्तूंवर निर्बंध किंवा विशेष अटी लागू असू शकतात. विमा सुविधा, आंतरराष्ट्रीय पार्सलसाठी विमा सुविधा उपलब्ध आहे. पॅकेजिंग सुविधा: पार्सल सुरक्षितरीत्या पाठविण्यासाठी डाक कार्यालयात पॅकेजिंग सुविधा उपलब्ध आहे. ट्रॅक अँड ट्रेस सुविधा पाठविलेल्या पार्सलची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ट्रॅक अँड ट्रेस सुविधा उपलब्ध आहे. बुकिंगपूर्वी संबंधित डाक कार्यालयाकडून अनुज्ञेय वस्तू, आवश्यक कागदपत्रे, वजन, शुल्क व इतर नियमांबाबत माहिती घ्यावी. दिवाळीच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय पार्सलची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने पार्सल शक्यतो आगाऊ बुक करावे. लागू शुल्क हे गंतव्य देश, बजन व पार्सलच्या प्रकारानुसार निश्चित करण्यात येईल. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील सर्व नागरिकांनी परदेशातील आपले कुटुंबीय, नातेवाईक व प्रियजनांना दिवाळी फराळ पाठविण्यासाठी पोस्टाच्या आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवर डाक अधीक्षक धुळे विभाग धुळे संजय ताठे यांनी केले आहे.



