*"आनंदवनभूवनी" ग्रंथाचे शिवथरघळीत प्रकाशन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*"आनंदवनभूवनी" ग्रंथाचे शिवथरघळीत प्रकाशन*
*"आनंदवनभूवनी" ग्रंथाचे शिवथरघळीत प्रकाशन*
नाशिक(प्रतिनिधी):-ज्येष्ठ समर्थ भक्त आणि श्री सुंदर मठ शिवथरघळ येथील विश्वस्त डॉ. विजय लाड यांनी समर्थ रामदास स्वामींच्या आनंदवनभूवनी या काव्यावरील विवेचन पर ग्रंथ प्रसिद्ध कीर्तनकार सौ. रोहिणी परांजपे यांच्या हस्ते ग्रंथराज दासबोधाची गंगोत्री शिवथरघळ येथे काल झाले.
दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन परिवाराचा दरवर्षीप्रमाणे मागील 41 वर्षांपासून शिवथरघळीत कोजागिरी पौर्णिमेपासून साधना सप्ताह चालू आहे. देशातल्या पाच राज्यांमधून आलेल्या जवळपास 150 पेक्षा जास्त साधकांच्या उपस्थितीत सौ. रोहिणी परांजपे यांचे वेणास्वामी यांच्या जीवनावरील अत्यंत सुश्राव्य आणि प्रबोधनपर कीर्तन झाले. यावेळी आनंदवन भूवनी या ग्रंथाचे प्रकाशन सौ. रोहिणी परांजपे यांचे हस्ते झाले. प्रकाशन प्रसंगी सौ मेधा कुलकर्णी, अपर्णा वांगीकर, श्री कौस्तुभ परांजपे, नीला अभ्यंकर सौ. विद्या लव्हेकर यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्यायशस्वीतेसाठी सौ. शुभदा थिटे, संतोष सप्रे, बाळासाहेब पाटील, सौ. सुचेता देशपांडे, सौ. विनया विद्वांस, सौ. शुभांगी समुद्र यांनी परिश्रम घेतले.



