*ऊसतोड कामगारांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रतिनिधींना सहकार्य करावे-सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ऊसतोड कामगारांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रतिनिधींना सहकार्य करावे-सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे*
*ऊसतोड कामगारांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रतिनिधींना सहकार्य करावे-सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ऊसतोड कामगारांची सामाजिक, आर्थिक व कौटुंबिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्ह्यात मे. स्मार्ट सर्व्हिसेस प्रा. लि. या संस्थेमार्फत ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ऊसतोड कामगारांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रतिनिधींना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुंदरसिंग वसावे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. ऊसतोड कामगारांची अद्ययावत माहिती उपलब्ध झाल्यास शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, शैक्षणिक सुविधा, आरोग्य विषयक सेवा, सामाजिक सुरक्षा तसेच रोजगार व कौशल्य विकास योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यास मदत होणार आहे. सर्वेक्षणादरम्यान कामगारांनी उपलब्ध असलेली आवश्यक कागदपत्रे व माहिती सर्वेक्षण पथकाला द्यावी. माहिती अचूक व वस्तुनिष्ठ स्वरूपाची असावी. तसेच माहिती देण्यापूर्वी सर्वेक्षण पथकातील प्रतिनिधींचे ओळखपत्र तपासून खात्री करावी.शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचे असून, एकही पात्र ऊसतोड कामगार सर्वेक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व संबंधितांनी सहकार्य करावे. सर्वेक्षणाबाबत काही अडचण अथवा अधिक माहिती आवश्यक असल्यास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकरतलाव रोड, जिल्हा परिषदेसमोर, नंदुरबार येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.



