*युथ पार्लमेंट स्पर्धेत EMRS नंदुरबारचे द्वितीय स्थान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*युथ पार्लमेंट स्पर्धेत EMRS नंदुरबारचे द्वितीय स्थान*
*युथ पार्लमेंट स्पर्धेत EMRS नंदुरबारचे द्वितीय स्थान*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समिति, नवी दिल्ली यांच्या द्वारे आयोजित द्वितीय विभागीय युथ पार्लमेंट स्पर्धेत एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल (EMRS), नंदुरबारच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय स्थान पटकावले. या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक व सहशैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सदर स्पर्धा ही एकलव्य मॉडेल रेसिडेंशीयल स्कूल, अजमेर सौंदाणे, सटाणा तालुका बागलाण, जिल्हा नाशिक येथे 27 ऑक्टोबर 2026 रोजी पार पडली. या विभागीय युथ पार्लमेंट स्पर्धेमध्ये EMRS नंदुरबारच्या विद्यार्थ्यांनी संसदीय कामकाजाचे प्रभावी सादरीकरण, विषयाची अचूक मांडणी, आत्मविश्वासपूर्ण वक्तृत्व आणि सभागृहातील शिस्त यांचे उत्कृष्ट दर्शन घडवत द्वितीय स्थान मिळवले. या युथ पार्लमेंट स्पर्धेत तनिशा पवार, प्रांजल गावीत, वर्षा गावीत, साहिल कोंकणी, उत्कर्षा वसावे आदि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात लोकशाही मूल्यांची जाणीव, संसदीय कार्यपद्धतीचे ज्ञान, नेतृत्वगुण, वक्तृत्वकला, सामाजिक व राजकीय प्रश्नांचे आकलन आणि निर्णयक्षमता विकसित होण्यास मदत होते. या स्पर्धेसाठी भेलावे, चावला आणि गुरमीत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे प्राचार्य अनिल मंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्राचार्यांनी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या यशामुळे EMRS नंदुरबारच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा परिसरातून त्यांच्यावर तसेच मार्गदर्शक शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



