*चिपळूण तालुक्यातील कळंबट येथे ‘मिशन बंधारे अभियान गडग्याच्या पऱ्यावर दोन बंधाऱ्यांची उभारणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*चिपळूण तालुक्यातील कळंबट येथे ‘मिशन बंधारे अभियान गडग्याच्या पऱ्यावर दोन बंधाऱ्यांची उभारणी*
*चिपळूण तालुक्यातील कळंबट येथे ‘मिशन बंधारे अभियान गडग्याच्या पऱ्यावर दोन बंधाऱ्यांची उभारणी*
चिपळूण(प्रतिनिधी):-राज्यात पावसाने दडी मारल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, शेतीसह नद्या, पऱ्या आणि नाल्यांमधील पाणीसाठ्यावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती चिपळूण आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन बंधारे अभियान 2026-27’ अंतर्गत कळंबट गावात जलसंधारणाचे महत्त्वपूर्ण काम करण्यात आले.
कळंबट येथील गडग्याचा पऱ्यावर वेगवेगळ्या ठिकाणी दोन बंधारे बांधण्यात आले. कुणबी शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, कळंबट येथील विद्यार्थी व शिक्षक, ग्रुप ग्रामपंचायत कळंबट-केरे-घवाळेगावचे सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सेविका आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा उपक्रम उत्साहात पार पडला. पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते अडवून ठेवणे, भूजलपातळी वाढविण्यास मदत करणे आणि परिसरातील पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवणे, या दृष्टीने बंधाऱ्यांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अशा प्रकारचे लोकसहभागातून होणारे जलसंधारणाचे उपक्रम उपयुक्त ठरू शकतात. या अभियानात कळंबट हायस्कूलचे शिक्षक महेंद्र शिरकर सर, सतीश जाधव, संतोष बळकटे, रवींद्र कोकमकर, सौ. साळुंके, प्रशांत पोवार, सीताराम बारगोडे, भुवड आणि कल्पेश कोकमकर यांच्यासह शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी, तसेच गावातील ग्रामस्थ बबन गमरे, सुधाकर केळकर, शरद शिरकर, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका मंजू कोकमकर, छाया घवाळे, अलका लिंगायत आणि आरोग्य सेविका यांनीही या उपक्रमात सहकार्य केले. शासनाच्या अभियानाला स्थानिक पातळीवर लोकसहभागाची जोड मिळाल्याने कळंबट गावात जलसंधारणाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली आहे. विद्यार्थी, शिक्षक, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन केलेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धन आणि जलसाक्षरतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत कळंबट ग्रामस्थांनी जलसंवर्धनासाठी एकजुटीचे दर्शन घडविले. भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी अशा लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.



