*35 दिव्यांग बांधवांना मिळाली प्रथमच हक्काची शिधापत्रिका,शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या पाठपुरावा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*35 दिव्यांग बांधवांना मिळाली प्रथमच हक्काची शिधापत्रिका,शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या पाठपुरावा*
*35 दिव्यांग बांधवांना मिळाली प्रथमच हक्काची शिधापत्रिका,शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या पाठपुरावा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पुरवठा विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 35 दिव्यांग बांधवांना प्रथमच त्यांच्या हक्काची शिधापत्रिका मंजूर झाली आहे. आमदार कार्यालयात नगरसेवक यशवर्धन रघुवंशी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना शिधापत्रिका मंजुरी आदेशांचे वितरण करण्यात आले. शिवसेना दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजयसिंग राजपूत यांनी दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काची शिधापत्रिका मिळावी, यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांच्याकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ॲड. रघुवंशी यांनी महसूल विभागाच्या पुरवठा शाखेसह तहसीलदार कार्यालयाशी सातत्याने संपर्क साधून या प्रकरणाचा पाठपुरावा केला.
दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजयसिंग राजपूत यांनी संबंधित दिव्यांग बांधवांची आवश्यक कागदपत्रे एकत्रित करून पुढील कार्यवाहीसाठी आमदार कार्यालयात जमा केली. त्यानंतर ही कागदपत्रे पुरवठा विभागाकडे दाखल करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी करून 35 दिव्यांग लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका मंजूर केल्या. अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या माध्यमातून पात्रतेनुसार शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ मिळणार आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या दिव्यांग बांधवांना अखेर हक्काची शिधापत्रिका मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले. आमदार कार्यालयात नगरसेवक यशवर्धन रघुवंशी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना शिधापत्रिका मंजुरी आदेशांचे वितरण करण्यात आले. यावेळी पप्पू गिरासे, शिवसेना दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजयसिंग राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष देविदास ठक्कर, जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल हिरे, जिल्हा सचिव सदु मराठे, जिल्हा सहप्रमुख राजेंद्र पाटील, नंदुरबार शहराध्यक्ष भास्कर कुवर, शहर सचिव प्रभाकर चौधरी, जिल्हा सदस्य भद्र सामुद्रे, शामराव पानपाटील, आनंदा गिरासे, तोंगल पाटील, भिकन ओंगले, रामचंद्र राजपूत, शेख भिकन शेख वहाब आदी उपस्थित होते.



