*घर घर संविधान अभियानांतर्गत संविधान उद्देशिका फ्रेम वितरणाची ई-निविदा रद्द*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*घर घर संविधान अभियानांतर्गत संविधान उद्देशिका फ्रेम वितरणाची ई-निविदा रद्द*
*घर घर संविधान अभियानांतर्गत संविधान उद्देशिका फ्रेम वितरणाची ई-निविदा रद्द*
नंदुरबार(प्रतिनिधी):-घर घर संविधान या कार्यक्रमांतर्गत भारतीय संविधानाची उद्देशिका/प्रस्ताविकेची फ्रेम वितरित करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली ई-निविदा रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नंदुरबार जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून घर घर संविधान या कार्यक्रमांतर्गत भारतीय संविधनाची उद्देशिका / प्रास्ताविकाची फ्रेम वितरीत करणेसाठी ई निविदा (बिड संख्या GEM/2026/B/959563) ही GEM पोर्टलवर 25 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत 24 सप्टेंबर 2026 होती. दरम्यान, शासन निर्णय 25 सप्टेंबर 2026 अन्वये सप्टेंबर महिन्यातील पावसाची टक्केवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी असल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जिल्ह्यात Trigger-1 (प्रथम कळ) लागू करून दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शासनाचे काटकसरीचे धोरण विचारात घेता, प्रसिद्ध करण्यात आलेली सदर ई-निविदा 25 ऑक्टोबर 2026 रोजीच्या आदेशान्वये रद्द करण्यात आली आहे. याबाबत सर्व निविदाधारकांनी व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी कळविले आहे.



