*अली अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आदिवासी जनजागृती कार्यक्रम संपन्न, 127 आदिवासी विद्यार्थ्यांचा सहभाग; शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अली अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आदिवासी जनजागृती कार्यक्रम संपन्न, 127 आदिवासी विद्यार्थ्यांचा सहभाग; शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन*
*अली अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आदिवासी जनजागृती कार्यक्रम संपन्न,127 आदिवासी विद्यार्थ्यांचा सहभाग; शिक्षण,आरोग्य आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-जामिया इस्लामिया इशाअतुल उलूमच्या अली अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी, अक्कलकुवा येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या सहकार्याने आदिवासी समुदाय जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात 10 शाळा व महाविद्यालयांतील 127 आदिवासी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिनेश खरात आणि जामियाचे अध्यक्ष मौलाना हुजैफा वस्तानवी साहेब उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुलाम जावेद खान यांनी स्वागतपर भाषणात कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट केली. तसेच या कार्यक्रमातून मिळालेले ज्ञान विद्यार्थ्यांनी आयुष्यभर शिकण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी आणि दैनंदिन जीवनात उपयोगात आणण्यासाठी प्रेरित केले. मौलाना हुजैफा वस्तानवी यांनी शिक्षण आणि आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांमधील मोबाईलच्या वाढत्या व्यसनाबाबत चिंता व्यक्त करून मोबाईलचा योग्य आणि मर्यादित वापर करण्याचे आवाहन केले. दिनेश खरात यांनी आरोग्य, स्वच्छता आणि चांगल्या सवयींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात सामुदायिक आरोग्य, सरकारी आरोग्य योजना, कम्युनिटी फार्मसी आणि पशू आरोग्य या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये डॉ. गणेश पवार, जुबेर शेख, महेश बी. कुंवर, डॉ. सय्यद अशफाक, पटेल एन. सिद्दीक आणि पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉ. मुख्तार अहमद खान यांचा समावेश होता. डॉ. गुलाम जावेद खान हे कार्यक्रमाचे संयोजक, तर डॉ. एजाज अहमद हे समन्वयक होते. प्रा. मोहम्मद यह्या आणि डॉ. जमील अब्बास यांनी सूत्रसंचालन केले. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी स्वयंसेवकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.कार्यक्रमाचासमारोप आभार प्रदर्शनाने झाला. आदिवासी समाजात शिक्षण, आरोग्यविषयक जागरूकता आणि सामाजिक विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.



