*रब्बी ज्वारी बियाणे मिनीकिटसाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रब्बी ज्वारी बियाणे मिनीकिटसाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*
*रब्बी ज्वारी बियाणे मिनीकिटसाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण उपअभियान पौष्टिक तृणधान्य योजनेतंर्गत रब्बी ज्वारी पिकासाठी 100 टक्के अनुदानावर बियाणे मिनीकिटचे वितरण करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी 1 हजार 740 मिनीकिटचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, पात्र व इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.सद्यस्थितीत दुष्काळसदृश परिस्थिती, पर्जन्यमानातील कमतरता आणि प्रतिकूल हवामानामुळे पाणीटंचाई व शेती उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रब्बी ज्वारी पिकाला प्रोत्साहन देण्यासाठी बियाणे मिनीकिट वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सन 2026 -27 या रब्बी हंगामासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण उपअभियान- पौष्टिक तृणधान्य (रब्बी ज्वारी) अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यास 1 हजार 740 मिनीकिटचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यासाठी एकूण 69.60 क्विंटल बियाण्याचा पुरवठा होणार आहे. तालुकानिहाय मिनीकिटचे वितरण, नंदुरबार 400 मिनीकिट (16 क्विंटल), शहादा 400 मिनीकिट (16 क्विंटल), नवापूर 300 मिनीकिट (12 क्विंटल), अक्कलकुवा 300 मिनीकिट (12 क्विंटल), तळोदा 170 मिनीकिट (6.80 क्विंटल), अक्राणी 170 मिनीकिट (6.80 क्विंटल). या योजनेतील लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलद्वारे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम लाभ’ या तत्त्वावर करण्यात येणार आहे. एका शेतकऱ्याला दोन वर्षांत एकदाच एकाच पीक किंवा वाणाचे मिनीकिट मिळेल. प्रत्येक मिनीकिटमध्ये 4 किलो बियाणे असून, त्याची कमाल किंमत 288 रुपये आहे. प्रत्येक मिनीकिटसोबत प्रक्रिया केलेले बियाणे, जैविक खतांची पाकिटे, मराठी भाषेतील पीक लागवड तंत्रज्ञानविषयक माहितीपत्रक तसेच संबंधित वाणांची माहितीपत्रके देण्यात येणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यात सन 2026-27 मध्ये विशेष बाब म्हणून रब्बी ज्वारीच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देणे, रब्बी ज्वारीच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ करणे तसेच प्रतिकूल पर्जन्यमानाच्या परिस्थितीत अन्नधान्य आणि पशुचाऱ्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यास मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. तरी पात्र शेतकऱ्यांनी 100 टक्के अनुदानावर उपलब्ध होणाऱ्या रब्बी ज्वारी बियाणे मिनीकिटचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर जास्तीत जास्त ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.



