*सयाजी शिंदे यांच्या ‘Save सह्याद्री’ अभियानाला स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीचा ठाम पाठिंबा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सयाजी शिंदे यांच्या ‘Save सह्याद्री’ अभियानाला स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीचा ठाम पाठिंबा*
*सयाजी शिंदे यांच्या ‘Save सह्याद्री’ अभियानाला स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीचा ठाम पाठिंबा*
मुंबई(प्रतिनिधी):-कर्जत–भीमाशंकर परिसरात टॉरंट पॉवर प्रकल्पासह विविध विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीचा स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीने तीव्र निषेध केला आहे. सह्याद्रीतील वृक्षतोड तातडीने थांबवून पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी ठाम मागणी समितीने केली आहे. या संदर्भात 26 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील आझाद मैदान परिसरातील मराठी पत्रकार संघात भारतीय जीवन व पृथ्वी रक्षण चळवळीच्या पुढाकाराने आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान समितीचे पदाधिकारी आमरेश पाथरे, मिलिंद प्रधान, विजय औटी, संजय धुरी आणि नितीन खेतले यांनी अभिनेते व निसर्गरक्षक, सह्याद्री-देवराई संस्थेचे संस्थापक सयाजी शिंदे यांची भेट घेतली. यावेळी समितीच्या वतीने ‘Save सह्याद्री - आपली सह्याद्री, आपले भविष्य वाचवण्यासाठी’ या पर्यावरण संरक्षण अभियानाला अधिकृत पाठिंबापत्र देण्यात आले. तसेच, सह्याद्रीच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या या लढ्यात स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि सदस्य सक्रियपणे सहभागी राहतील, अशी ग्वाही देण्यात आली. सह्याद्रीचे जंगल, जैवविविधता आणि नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण ही केवळ पर्यावरणाची नव्हे, तर महाराष्ट्राच्या भविष्याची लढाई आहे. या लढ्यात स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती ठामपणे सयाजी शिंदे यांच्या पाठीशी उभी राहील, असे संघटनेचे सरचिटणीस आमरेश पाथरे यांनी सांगितले.



