*भारतीय जनता पार्टी नंदुरबार शहर मंडलाच्या नवीन कार्यकारणी जाहीर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भारतीय जनता पार्टी नंदुरबार शहर मंडलाच्या नवीन कार्यकारणी जाहीर*
*भारतीय जनता पार्टी नंदुरबार शहर मंडलाच्या नवीन कार्यकारणी जाहीर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारतीय जनता पार्टी नंदुरबार शहर मंडलाच्या नवीन कार्यकारणीची घोषणा आज करण्यात आली. भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर मंडल अध्यक्ष छोटू मख्खु चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी शहर मंडल अध्यक्ष यांनी सांगितले की, संघटनात्मक बांधणी लक्षात घेऊन नव्या व जुन्या कार्यकर्त्यांचा समन्वय साधून ही कार्यकारणी तयार करण्यात आली आहे. पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचवणे व केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे हे या कार्यकारणीचे मुख्य उद्दिष्ट राहील. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष निलेश माळी, शहर मंडल अध्यक्ष छोटू चौधरी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील कायदा सेल जिल्हाध्यक्ष महेश माळी प्रदेश सदस्य प्रा.पंकज पाठक ओबीसी मोर्चा जिल्ह्ध्यक्ष मनोज गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र चौधरी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



