*इयत्ता 4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा 21 फेब्रुवारी 2027 रोजी; ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*इयत्ता 4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा 21 फेब्रुवारी 2027 रोजी; ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात*
*इयत्ता 4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा 21 फेब्रुवारी 2027 रोजी; ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात*
पुणे(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 4 थी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 7 वी) 21 फेब्रुवारी 2027 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत एकाच वेळी घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 27 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झाली आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.
शासन निर्णयानुसार सन 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून आता नियमितपणे इयत्ता 4 थी आणि इयत्ता 7 वी या स्तरांवरच शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जात आहे. या परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 वर्षांसाठी दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये इयत्ता 4 थीसाठी रु. 500 दरमहा आणि इयत्ता 7 वीसाठी रु.750 दरमहा शिष्यवृत्ती अनुज्ञेय आहे.
अर्ज भरण्याचे वेळापत्रक: नियमित शुल्कासह: 27 ऑक्टोबर 2026 ते 30 नोव्हेंबर 2026, विलंब शुल्कासह: 1 डिसेंबर 2026 ते 15 डिसेंबर 2026, अतिविलंब शुल्कासह: 16 डिसेंबर 2026 ते 23 डिसेंबर 2026, अति विशेष विलंब शुल्कासह: 24 डिसेंबर 2026 ते 31 डिसेंबर 2026
31 डिसेंबर 2026 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.
परीक्षेचे स्वरूप व पात्रता:
महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य शाळांमध्ये शिकणारे आणि राज्याचे रहिवासी असलेले विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत. 1 जून 2026 रोजी इयत्ता 4 थीच्या विद्यार्थ्याचे वय कमाल 10 वर्षे (दिव्यांग: 14 वर्षे) आणि इयत्ता 7 वीच्या विद्यार्थ्याचे वय कमाल 13 वर्षे (दिव्यांग: 17 वर्षे) असणे आवश्यक आहे. परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगु व कन्नड अशा 7 माध्यमांत आणि सेमी- इंग्रजीच्या 6 पर्यायांसह घेतली जाईल. दोन्ही पेपर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाचे असतील. अधिकृत संकेतस्थळ: शाळांनी विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे www.mscepune.in किंवा https://puppssmsce.in या अधिकृत संकेत स्थळावरूनच ऑनलाईन पद्धतीने भरावीत, असे आवाहन परीक्षा परिषदेने केले आहे.



