*मूल्यवर्धनातून घडणार सुसंस्कारित पिढी! प्रकाशा केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न; शिक्षकांना मूल्याधिष्ठित शिक्षणाचे सखोल मार्गदर्शन* नंदुरबार(प्रतिनिधी):- विद्यार्थ्यांच्या à
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मूल्यवर्धनातून घडणार सुसंस्कारित पिढी! प्रकाशा केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न; शिक्षकांना मूल्याधिष्ठित शिक्षणाचे सखोल मार्गदर्शन* नंदुरबार(प्रतिनिधी):- विद्यार्थ्यांच्या à
*मूल्यवर्धनातून घडणार सुसंस्कारित पिढी! प्रकाशा केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न; शिक्षकांना मूल्याधिष्ठित शिक्षणाचे सखोल मार्गदर्शन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा, जबाबदारी, सहकार्य, संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीव यांसारखी जीवनमूल्ये रुजविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत प्रकाशा केंद्रस्तरीय एक दिवसीय शिक्षण परिषद सर्वोदय प्राथमिक शाळा, प्रकाशा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.समन्वयातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास
या शिक्षण परिषदेच्या नियोजनासाठी आणि अंमल बजावणीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य डॉ दिपक साबळे, शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे शहादा तालुका समन्वयक अंबालाल भिलावे, तसेच पंचायत समिती शहादा गटशिक्षणाधिकारी डि.डि.राजपूत यांच्याशी समन्वय साधून आवश्यक सहकार्य करण्यात आले. सरस्वती माता प्रतिमेचे पूजन सर्वोदय विद्यालय प्रकाशा मुख्याध्यापक एस. आर. पाटील, विनोद चव्हाण विषयतज्ञ बीआरसी शहादा, मनोज पिंजारी केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक रामलाल पारधी, मुख्याध्यापक मनोज पाटील, जितेंद्र चौधरी विशेष शिक्षक आदी उपस्थित होते. प्रकाशा केंद्राचे केंद्रप्रमुख मनोज पिंजारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत केंद्रातील विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी शिक्षकांना नवी दिशा महाराष्ट्र शासन आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक विचार, योग्य निर्णयक्षमता आणि जबाबदार वर्तनाची रुजवणूक करण्यावर भर दिला जात आहे.
शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या हेतूने केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. मागील वर्षातील अनुभवांचा आढावा घेणे, शिक्षकांच्या शंकांचे निरसन करणे आणि मूल्यवर्धनाच्या विविध कृतींचा वर्गाध्यापनात प्रभावी वापर करण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनविणे, हा प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता.
सीआरजी विषयतज्ञ गोपाल गावीत यांचे सखोल मार्गदर्शन संपूर्ण वेळ मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या विविध पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन केले. मूल्यवर्धनाची संकल्पना, कार्यक्रमाची उद्दिष्टे, प्रत्यक्ष वर्गातील अंमलबजावणी, अध्यापनाचे नियोजन, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि मूल्यमापन या विषयांचे त्यांनी सखोल विवेचन केले.
मूल्यशिक्षण हे केवळ स्वतंत्र उपक्रमापुरते मर्यादित न ठेवता दैनंदिन अध्यापन प्रक्रियेतून विद्यार्थ्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना अनुभवाधारित कृतींच्या माध्यमातून जीवनमूल्ये आत्मसात करण्याची संधी दिल्यास त्यांचा सर्वांगीण विकास अधिक प्रभावीपणे साधता येतो, यावरही त्यांनी विशेष भर दिला.
अनुभवांची देवाणघेवाण, प्रात्यक्षिके आणि शंकानिरसन
प्रशिक्षणादरम्यान मागील वर्षातील मूल्यवर्धन उपक्रमाच्या अंमल बजावणीतील अनुभवांची देवाणघेवाण करण्यात आली. तसेच निवडक विषयांवरील मार्गदर्शक व्हिडिओ आणि उजळणी मार्गदर्शिकेच्या आधारे उपक्रमांचे प्रात्यक्षिक, अध्यापन नियोजन आणि मूल्यमापन यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षकांच्या शंकांचे निरसन करून वर्गस्तरावर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक दिशा देण्यात आली.
या प्रक्रियेमुळे मूल्यवर्धन कार्यक्रमाकडे केवळ एक शैक्षणिक उपक्रम म्हणून न पाहता विद्यार्थ्यांच्या विचारप्रक्रियेत, वर्तनात आणि व्यक्तिमत्त्वात सकारात्मक परिवर्तन घडविणारे प्रभावी माध्यम म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन शिक्षकांना मिळाला.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना केंद्रप्रमुख श्री. मनोज पिंजारी यांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाची उद्दिष्टे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षकांनी सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध आणि कृतीशील प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद यांच्या सहभागामुळे परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मूल्याधिष्ठित शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या परिषदेतून अधोरेखित झाला.
“ज्ञानाने बुद्धिमत्ता विकसित होते, तर मूल्यांनी व्यक्तिमत्त्व घडते!” या विचाराला केंद्रस्थानी ठेवून संपन्न झालेली प्रकाशा केंद्रस्तरीय शिक्षण परिषद ही गुणवत्तापूर्ण, संस्कारक्षम आणि जीवनाभिमुख शिक्षणाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरली. असेही मार्गदर्शन बीआरसी विषय तज्ञ विनोद चव्हाण यांनी सांगितले. तसेच विशेष सेवा स्वच्छता सप्ताह कार्यक्रम अंमलबजावणी, प्रशासकीय विषयांवर माहिती देण्यात आली. प्रकाशा केंद्रात नवीन आलेल्या शिक्षक बांधवांचे सत्कार करण्यात आला. शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक श्रीमती किर्ती जोशी यांनी केले. आभार गौरव पाटील, नितीन साळुंखे यांनी केले.



