*शहादा येथे 2 व 3 नोव्हेंबर रोजी ‘अमृत पेठ - थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाचे आयोजन, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शहादा येथे 2 व 3 नोव्हेंबर रोजी ‘अमृत पेठ - थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाचे आयोजन, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*
*शहादा येथे 2 व 3 नोव्हेंबर रोजी ‘अमृत पेठ - थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाचे आयोजन, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच ग्राहकांना दर्जेदार वस्तू थेट उत्पादकांकडून खरेदी करता याव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्यावतीने सप्तशृंगी माता मंदिरच्या पाठीमागे, अतिथी बँक्वेट हॉल, शहादा जि.नंदुरबार येथे 2 व 3 नोव्हेंबर 2026 रोजी ‘अमृत पेठ - थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती अमृतचे जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.
या प्रदर्शनात घरगुती खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, कपडे, दागिने तसेच दैनंदिन वापरातील विविध उपयुक्त वस्तूंचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. अमृतच्या लक्षित गटातील स्थानिक महिला उद्योजिका, लघुउद्योजक आणि नवउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व थेट विक्री करण्यासाठी या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना विविध प्रकारच्या वस्तू एकाच ठिकाणी पाहण्याची आणि उत्पादकांकडून थेट खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, उद्योजकांच्या विक्रीला चालना देणे आणि ग्राहक व उत्पादक यांच्यात थेट संपर्क निर्माण करणे, हा या प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश आहे. सणासुदीच्या काळात स्थानिक उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य मिळाल्यास स्थानिक उद्योजकांना आर्थिक बळ मिळण्यास मदत होणार आहे.
या प्रदर्शनास शहादा शहरासह परिसरातील नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांची खरेदी करावी आणि त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे, अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे 9112228771, कार्यक्रम प्रमुख दिनेश पाठक 8087953940 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन अमृत संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.



