*महामंडळाच्या व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हा व्यवस्थापक सदाशिव पाटील*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महामंडळाच्या व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हा व्यवस्थापक सदाशिव पाटील*
*महामंडळाच्या व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा- जिल्हा व्यवस्थापक सदाशिव पाटील*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत कर्जदारांसाठी सुधारित एकरकमी परतावा योजना (ओटीएस) राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत संपूर्ण थकीत कर्जाची रक्कम एकरकमी भरणाऱ्या लाभार्थ्यांना व्याजाच्या रकमेत 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. कर्जदारांनी या योजनेचा लाभ घेऊन 31 मार्च 2027 पर्यंत थकीत कर्जाचा भरणा करून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सदाशिव पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र कर्जदारांनी विहित मुदतीत थकीत कर्जाचा एकरकमी भरणा करावा. त्यामुळे लाभार्थ्यांना व्याजाच्या रकमेत 50 टक्के सवलत मिळू शकणार आहे. योजनेची अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार दूरध्वनी क्रमांक 02564 -210062 येथे संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पाटील यांनी केले आहे.



