*वडवली हायस्कूलच्या कुमारी अस्मिता पळसमकरची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वडवली हायस्कूलच्या कुमारी अस्मिता पळसमकरची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड*
*वडवली हायस्कूलच्या कुमारी अस्मिता पळसमकरची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड*
राजापूर(प्रतिनिधी):- 18 ऑक्टोबर 2026 रोजी एस. व्ही. जे. सी. टी. क्रीडा संकुल, डेरवण येथे आयोजित राष्ट्रीय आंतरजिल्हा ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा 2026 मध्ये श्रीमती उमा शरद परुळकर माध्यमिक विद्यालय, वडवली या प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी अस्मिता महादेव पळसमकर हिने 80 मीटर अडथळा शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अस्मिताने हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे 14 ते 16 नोव्हेंबर 2026 या कालावधीत ऑक्सन विद्यापीठ कामकोले, हैदराबाद, तेलंगणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
अस्मिताच्या या यशामुळे तिचे मार्गदर्शक प्रशालेचे क्रीडाशिक्षक नालापल्ले, तिचे पालक, संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक शिंदे,आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. तिच्या या यशाने वडवली प्रशालेसह राजापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
अस्मिताच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



