*जिल्ह्यातील 5 लाख 2 हजार 877 बालकांना मिळणार जंतनाशक गोळ्या 27 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन, 3 नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्ह्यातील 5 लाख 2 हजार 877 बालकांना मिळणार जंतनाशक गोळ्या 27 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन, 3 नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन*
*जिल्ह्यातील 5 लाख 2 हजार 877 बालकांना मिळणार जंतनाशक गोळ्या 27 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन, 3 नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील 1 ते 19 वर्षे वयोगटातील बालके आणि किशोरवयीन मुला-मुलींचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासास मदत व्हावी आणि त्यांना कृमीसंसर्गापासून संरक्षण मिळावे,यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने 27 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील 1 ते 19 वर्षे वयोगटातील 502877 लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्या सेवनास देण्यात येणार आहे. जिल्हा कृती दल समिती सभा समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या उपस्थितीत संपन्न झाली, या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर निपटे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. संजीव वळवी, तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये जंत विरोधी मोहिम यशस्वी राबविण्याबाबत सर्व वैद्यकीय अधिकारी व पर्यवेक्षक यांचा तालुकास्तरीय आढावा व प्रशिक्षण घेण्यात आले असून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सर्व आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी कर्मचारी व शिक्षक /मुख्याध्यापक यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. तसेच मोहिमेबाबत विविध समाज माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. या मोहिमेत शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी केंद्रे आणि आरोग्य संस्थांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना वयोगटानुसार निर्धारित मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. यामध्ये अंगणवाडी केंद्रातील बालके, शाळामध्ये शिक्षण घेणारे विध्यार्थी, शाळाबाह्य बालके व किशोरवयीन मुला-मुलींचा समावेश आहे. या मोहिमेंतर्गत अल्बेंडाझोल 400 मिलीग्राम हे जंतनाशक औषध देण्यात येणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार 1 ते 2 वर्षे वयोगटातील बालकांना अर्धी गोळी (200 मिलीग्राम) बारीक करून पाण्यात विरघळवून, 2 ते 3 वर्षे वयोगटातील बालकांना एक गोळी (400 मिलीग्राम) बारीक करून पाण्यात विरघळवून देण्यात येणार आहे. तर 3 ते 19 वर्षे वयोगटातील बालकांना एक पूर्ण गोळी (400 मिलीग्राम) चावून खाण्यास देण्यात येणार आहे. 27 तारखेच्या जंतनाशक दिनी गोळी घेण्यापासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांसाठी ३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात येणार आहे. अशा लाभार्थ्यांना या दिवशी गोळी देण्यात येईल.
पालकांनी आपल्या पाल्याने जंतनाशक गोळी घेतली आहे याची खात्री करावी. शिक्षकांनी पात्र लाभार्थ्यांना गोळ्यांचे सेवन करून घेण्यासाठी तसेच मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागास सहकार्य करावे.
मोहीम यशस्वी होण्यासाठी आरोग्य विभाग ,शिक्षण विभाग, महिला बालविकास विभाग यांनी समन्वयाने काम करावे तसेच 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुला -मुलींनी 27 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनी जंतनाशक गोळ्यांचे सेवन करावे, यासाठी सर्व पालकांनी आणि शिक्षकांनी या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.



