*महामंडळाचे थकीत कर्ज नियमित भरण्याचे आवाहन, जिल्हा व्यवस्थापक एस. सी. चव्हाण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महामंडळाचे थकीत कर्ज नियमित भरण्याचे आवाहन, जिल्हा व्यवस्थापक एस. सी. चव्हाण*
*महामंडळाचे थकीत कर्ज नियमित भरण्याचे आवाहन, जिल्हा व्यवस्थापक एस. सी. चव्हाण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत समाजातील पात्र लाभार्थ्यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. मात्र, महामंडळाच्या कर्ज योजनांमधील थकीत कर्जाची वसुली अत्यल्प असल्याने नवीन लाभार्थ्यांना कर्ज वितरण करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सर्व थकीत कर्जदारांनी आपल्याकडील कर्जाची रक्कम नियमित भरावी, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. सी. चव्हाण यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
महामंडळामार्फत विविध कर्ज योजनांसह एनएस एफडीसीच्या सहकार्यानेही कर्ज वितरण करण्यात आले आहे. तसेच बँकांमार्फत अनुदान व बीजभांडवल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, अनेक लाभार्थ्यांनी कर्जाची परतफेड न केल्यामुळे थकबाकी वाढली आहे. एनएसएफडीसीकडून थकीत कर्जाची वसुली झाल्याशिवाय पुढील निधी उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याने मंजूर कर्ज प्रकरणांचे वितरणही प्रभावित झाले आहे. परिणामी, शैक्षणिक कर्ज योजना व मुदत कर्ज योजनांसह महामंडळाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम होत आहे.बँकांमार्फत वितरित केलेल्या कर्जाची परतफेड न झाल्याने नवीन कर्जासाठी अर्ज करणाऱ्या बेरोजगार लाभार्थ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. थकीत कर्जाच्या प्रमाणामुळे महामंडळाची बँकांमधील पतिमा प्रभावित होत असून, नवीन कर्ज प्रस्तावांना मंजुरी मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच कर्जवसुली अत्यल्प असल्यामुळे शासनस्तरावरही नाराजी व्यक्त केली जात आहे.
महामंडळामार्फत विशेष कर्जवसुली अभियान राबविण्यात येत असून, थकीत कर्जदारांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये कर्जदारांना वसुलीसाठी नोटीस बजावणे, त्यांच्या तसेच जामीनदारांच्या घरी भेटी देणे आणि संभाव्य कारवाईबाबत अंतिम नोटीस पाठविण.
कर्जदाराने दिलेल्या जामीनदाराच्या प्रकारानुसार कायदेशीर तरतुदींच्या अधीन राहून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असलेल्या जामीनदाराच्या बाबतीत लागू नियमांनुसार वेतनातून वसुली करण्यासाठी संबंधित कार्यालयाशी पत्रव्यवहार केला जाऊ शकतो. तसेच मालमत्ता असलेल्या जामीनदाराविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. कर्जवसुलीसाठी दिलेले धनादेश बँकेत जमा केले जातात. खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे धनादेश अनादरित झाल्यास, लागू कायदेशीर तरतुदींनुसार पुढील कारवाई करण्यात येईल. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी गावपातळीवर वसुली मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असून, थकीत कर्जदारांविरुद्ध लोकअदालतीतही प्रकरणे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील लाभार्थींनी स्वतःच्या तसेच आपल्या मुलांच्या आणि समाजातील इतर घटकांच्या विकासासाठी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कर्जाची नियमित परतफेड करणे आवश्यक आहे. थकीत कर्जदारांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून थकीत रक्कम भरावी. थकीत कर्जदारांनी वेळेत कर्जफेड करून स्वतःवरील तसेच जामीनदारांवरील संभाव्य आर्थिक व कायदेशीर अडचणी टाळाव्यात, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. सी. चव्हाण यांनी केले आहे.



