*सहा वर्षपूर्ती निमित्ताने शिवछत्रपती स्मारकावर जयघोषात सामूहिक दुग्धाअभिषेक-पूजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सहा वर्षपूर्ती निमित्ताने शिवछत्रपती स्मारकावर जयघोषात सामूहिक दुग्धाअभिषेक-पूजन*
*सहा वर्षपूर्ती निमित्ताने शिवछत्रपती स्मारकावर जयघोषात सामूहिक दुग्धाअभिषेक-पूजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-हिंदु सेवा सहाय्य समितीने गेल्या सहा वर्षापासून जुनी नगरपालिका स्थित शिवछत्रपतींचा स्मारकावर दररोज सकाळी 7.30 वाजता नित्य अभिषेक पूजन सुरू आहे. या सेवेला 2190 दिवस म्हणजे सहा वर्षपुर्ती निमित्ताने शिवछत्रपती पुतळ्याचे जयघोषात सामूहिक दुग्धभिषक-पूजन कार्यक्रम तिथीनुसार अश्विन शुद्ध एकादशी रोजी करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात शिवछत्रपतींचा पूर्ण घोषणाने पृथ्वीसिंह राजपूत करून जागृती पाटीलने प्रेरणामंत्राने सुरुवात केली. धर्मसेवक डॉ नरेंद्र पाटील यांनी उपक्रम सुरू करण्याचा उद्देशात सांगितले की, ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्या शिवछत्रपतींचे स्मरण एक किंवा दहा दिवस नव्हे तर प्रत्येक दिवसाची सुरुवात त्यांच्या स्मरणाने हिंदूंनी करावी, महाराजांचा पुतळ्याची नित्य सेवा व्हावी याउद्देशाने गेल्या सहा वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक एकत्रित येऊन दररोज सकाळी 7.30 वाजता जुनी नगरपालिका स्थित शिवस्मारकावर नित्य अभिषेक- पूजन करत आहेत,
तरी सर्व शिवभक्तांनी अभिषेक पूजनासाठी दररोज उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे जयघोषात दूधाभिषेक पूजन उज्वल राजपूत, विनायक राजपूत यांच्या हस्ते तर सुगंधी द्रव्यांनी जलाभिषेक करण्यात आले. पूजन जेष्ठ स्वयंसेवक रवि बोडस यांच्या हस्ते तर माल्यार्पण आनंदा माळी व कमलबाई माळी यांनी केले. ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी संदीप राजपूत, पंकज डाबी, उज्वल राजपूत, पंकज मुसळे, विनायक राजपूत, पृथ्वीसिंह राजपूत, जागृती पाटील, पृथ्वीसिंह उज्वल राजपूत व मोठ्या संख्येने शिवभक्त, हिंदुत्ववादी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवकांनी यांनी परिश्रम घेतले.



