*दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी उमरागव्हाणमध्ये लोकसहभागातून जलसंवर्धनाचा जागर, आंबापाटीपाडा येथे उदेय नदीवरील केटी बंधाऱ्याची दुरुस्ती,65 ते 70ग्रामस्थांचे श्रमदान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी उमरागव्हाणमध्ये लोकसहभागातून जलसंवर्धनाचा जागर, आंबापाटीपाडा येथे उदेय नदीवरील केटी बंधाऱ्याची दुरुस्ती,65 ते 70ग्रामस्थांचे श्रमदान*
*दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी उमरागव्हाणमध्ये लोकसहभागातून जलसंवर्धनाचा जागर, आंबापाटीपाडा येथे उदेय नदीवरील केटी बंधाऱ्याची दुरुस्ती,65 ते 70ग्रामस्थांचे श्रमदान*
अक्कलकुवा(प्रतिनिध):-दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्याने पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी अक्कलकुवा तालुक्यातील उमरागव्हाण- जमाना ग्रामपंचायतीने लोकसहभागातून जलसंवर्धनाचा पुढाकार घेतला आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश केवळ घोषणांपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवत 24 ऑक्टोबर रोजी आंबापाटीपाडा येथे उदेय नदीवरील केटी बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम ग्रामस्थांनी श्रमदानातून केले. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करणारा हा उपक्रम परिसरात जलसंवर्धनाचा जागर घडविणारा ठरला. या मोहिमेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक आदिवासी बोलीभाषेच्या माध्यमातून ग्रामस्थांपर्यंत जलसंवर्धनाचे महत्त्व पोहोचविण्यात आले. आरोग्य सेवक बी. टी. पाडवी यांनी स्थानिक बोलीभाषेत संवाद साधत पाणी अडविण्याची गरज, उपलब्ध जलस्रोतांचे संरक्षण आणि पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करण्याबाबत ग्रामस्थांना समजावून सांगितले. परिचित बोलीभाषेतून केलेल्या आवाहनामुळे लोकसहभागाला चालना मिळाली आणि ग्रामस्थांनी प्रत्यक्ष कामात सहभागी होत जलसंवर्धनाच्या कार्याला हातभार लावला. या उपक्रमात गावातील सुमारे 65 ते 70 नागरिकांनी एकत्र येत केटी बंधाऱ्याच्या दुरुस्ती व जलसंवर्धनाच्या कामासाठी श्रमदान केले. पाण्याची टंचाई निर्माण होण्यापूर्वीच उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे, पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे. आरोग्य सेवक बी. टी. पाडवी यांच्या विशेष मार्गदर्शन व सहकार्याने पार पडलेल्या या मोहिमेतून ग्रामीण भागातील स्थानिक नेतृत्व, लोकसहभाग आणि पारंपरिक संवादपद्धती यांच्या बळावर जलसंवर्धनाची चळवळ उभी राहू शकते, हे अधोरेखित झाले.



