*भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 29 ऑक्टोबरला रत्नागिरीत "शाश्वत पाणी परिषद"*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 29 ऑक्टोबरला रत्नागिरीत "शाश्वत पाणी परिषद"*
*भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 29 ऑक्टोबरला रत्नागिरीत "शाश्वत पाणी परिषद"*
रत्नागिरी(प्रतिनिधी):-रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित आणि हिरवळ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 29 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत जिल्हा नियोजन हाॅल, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे शाश्वत पाणी परिषदचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीत पाण्याचे नियोजन कसे करावे जलमिनी जलसंकट - जलसंकटाची जाणीव व उपाययोजना, पाणी बचत प्राधान्यक्रम, स्थानिक संस्थांचे नियम- स्थानिक पातळीवरील नियोजन, उद्योग व शेती निर्बंध - उद्योग व शेतीसाठी जबाबदार वापर, कठोर अंमलबजावणी - नियमांची प्रभावी अंमलबजावणी ही कार्यक्रमाची वैशिष्ट्ये असणार आहेत. या परिषदेचे जलप्रेमी व जलदूत जलसेवक यांनी आयोजन केले आहे. भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व त्यावर उपाययोजना जाणून घेण्यासाठी या पाणी परिषदेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



