*शासनाची वाट न पाहता वहाळावर बांधला तात्पुरता साकव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शासनाची वाट न पाहता वहाळावर बांधला तात्पुरता साकव*
*शासनाची वाट न पाहता वहाळावर बांधला तात्पुरता साकव*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे रायपाटण येथील खाडेवाडीचे सुपुत्र आणि मोतादेवी उत्कर्ष मंडळाचे सक्रीय कार्यकर्ते श्री विजय म्हादये यांनी आपल्या घराकडे जाणाऱ्या रहदारीच्या वाटेवरील वहाळावर कच्च्या स्वरुपात साकव तयार केला काम कोणतेही असो परंतु ते मनापासून करण्याची जिद्द हवी म्हादये यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विजय म्हादये हे नोकरी निमित्त मुंबईत स्थायिक असतात गणपतीत आपल्या गावी रायपाटण मधील खाडेवाडी येथे आले होते त्यांच्या घराकडे जाणाऱ्या वाटेवरील वहाळात पावसाळ्यात भरपूर पाणी येत असल्याने वाडीतील मंडळींना त्यांच्याकडे जाता येत नसे येथील छोटेखानी वहाळावर पूल व्हावा यासाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावाही केला परंतु यश आले नाही तरीही त्यांनी हार न मानता यावर तोडगा म्हणून भाऊबंदांना एकत्र केले बांबू तर बाजूच्या परसवात होतेच त्याची कामटे पाडली आणि रानातून सरळसोट वासे आणून सर्वांच्या मदतीने वहाळावर आडवे घातले आणि महत्प्रयासाने येथे साकव तयार केला. त्यामुळे वहाळाला पूर आला तरी वाडीतील मंडळींना या साकवा वरुन जाता येता आले त्यांच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत असून एखाद्या कामासाठी प्रशासनावर अवलंबून न राहता तात्पुरत्या स्वरूपात आपण त्यावर उपाय योजना करुन तो प्रश्न सोडवू शकतो हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.



