*के.आर.ची अंडर-17 मुलीने जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के.आर.ची अंडर-17 मुलीने जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला*
*के.आर.ची अंडर-17 मुलीने जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने आयोजित झालेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत के.आर. पब्लिक स्कूल ची अंडर-17 मुलींच्या (वैयक्तिक गट) स्पीड स्केटिंग मध्ये हंसिका सुर्यवंशी ने प्रथम क्रमांक मिळवून शाळेचे नाव अभिमानाने उंचावले आहे. या यशामुळे तीची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली असून, सदर विद्यार्थिनीने पुढील टप्प्यासाठी प्रवेश मिळवला आहे. या स्पर्धेत सदर विद्यार्थिनीने दर्शविलेल्या चपळाई, नियमित सरावाची कार्यक्षमता आणि खेळाविषयीच्या आत्मविश्वासामुळे शाळेला जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. शाळेचे अध्यक्ष किशोर वाणी यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करत त्यांना विभागीय स्पर्धेतही यश मिळावे, अशी शुभेच्छा दिली. उपाध्यक्ष सिद्धार्थ वाणी तसेच प्राचार्य डॉ. छाया शर्मा यांनीही संघाचे कौतुक केले. याप्रसंगी उपप्राचार्य, प्रशिक्षक योगेश बेदरकर, खेळ शिक्षक निशांक, रोहित शाळेचे सर्व पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.



