*17 गुन्हे दाखल असलेला सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून बेड्या, 47 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत, 2 गुन्ह्यांची उकल, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*17 गुन्हे दाखल असलेला सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून बेड्या, 47 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत, 2 गुन्ह्यांची उकल, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी*
*17 गुन्हे दाखल असलेला सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून बेड्या, 47 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत, 2 गुन्ह्यांची उकल, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-18 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 21/15 ते दिनाक 19 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 06/30 वाजेचे दरम्यान नंदुरबार शहरात प्लॉट नं. 41 ब योगेश्वर कॉलनी नळवा रोड येथे फिर्यादीचे बंद घराचे पुढील दरवाजाचा कोंडा कोणीतरी अज्ञात आरोपीताने तोडुन घरात प्रवेश करुन पुढील रुम मधिल लॉखडी कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेले 30,000 रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने व 12 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असा मुद्देमाल अज्ञात आरोपीताने घरफोडी चोरी करुन चोरुन नेले म्हणून गुन्हा उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा जळगांव जिल्ह्यातील चोपडा शहरात राहणारा सराईत गुन्हेगार प्रविण लोटन कोळी याने केलेली आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कळवून बातमीची खात्री करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करणेकामी आदेशित केले.
त्याप्रमाणे दिनांक 21 ऑक्टोबर 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगांव जिल्ह्यातील चोपडा शहरात जावून मिळालेल्या संशयीत आरोपीताची माहिती काढून त्यास एका विना नंबरच्या मोटार सायकलसह ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रविण लोटन कोळी रा. सुटकार ता. चोपडा जि. जळगांव असे सांगितले. त्यास नंदुरबार शहरात घडलेल्या वर नमुद दाखल गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा स्वतः केलेबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच त्यास गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने त्याच्या खिशातून 02 मोबाईल मिळून आले त्यापैकी 01 मोबाईल हा नंदुरबार येथून चोरी केलेला व एक मोबाईलबाबत काही एक उपयुक्त माहिती दिली नाही. तसेच सोने धातुचे दागिने हे त्याचा ओळखीचा राहुल ऊर्फ भावशा बळीराम बावीस्कर रा. सुटकार ता. चोपडा जि. जळगांव यास दिल्याचे सांगितल्याने. राहुल ऊर्फ भावशा याने कोणतेही समाधानकारक उत्तरे दिले नाही किंवा दागिने काढून दिले नाही.
तसेच राहुल ऊर्फ भावशा याच्या ताब्यात मिळून आलेल्या मोटार सायकलचे कागदपत्रांबाबत विचारले असता त्याने सदरची मोटार सायकल ही 15 ते 20 दिवसापूर्वी नंदुरबार शहरातून चोरी केलेली असलेबाबत
सांगितले. त्याबाबत नंदुरबार शहर व उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता त्याबाबत उपनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 389/2026 अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाल्याने राहुल ऊर्फ भावशा याचे ताब्यात मिळून आलेला 22 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल व 25 हजार रुपये किमतीची एक मोटार सायकल असा एकूण 47 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेला आरोपी नामे प्रविण लोटन कोळी रा. सुटकार ता. चोपडा जि. जळगांव याचेवर जळगांव जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर 17 मालमत्ते विरुध्चे व राहुल ऊर्फ भावशा बळीराम बावीस्कर रा. सुटकार ता. चोपडा जि. जळगांव याच्याविरुध्द् अमळनेर पोलीस ठाणे येथे यापूर्वी खूनाचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधिक्षक श्री. अशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उप निरीक्षक महेश निकम, पोलीस उप निरीक्षक विकास गुंजाळ पोलीस हवालदार योगेंद्र सोनार, पोलीस हवालदार मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार राहुल पांढारकर, अभय राजपुत, विनोद पाटील, रोहिणी धनगर यांच्या पथकाने केली आहे.



