*अखिल भारतीय बार परीक्षेसाठी (AIBE) खान्देशात स्वतंत्र परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अखिल भारतीय बार परीक्षेसाठी (AIBE) खान्देशात स्वतंत्र परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याची मागणी*
*अखिल भारतीय बार परीक्षेसाठी (AIBE) खान्देशात स्वतंत्र परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याची मागणी*
नाशिक(प्रतिनिधी):-अखिल भारतीय बार परीक्षेसाठी (AIBE) खान्देशात स्वतंत्र परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याची मागणी, ॲड.मनोज सूर्यवंशी यांनी बार कौन्सिल महाराष्ट्र व गोव्याचे अध्यक्ष ॲड. जयंत जायभावे यांच्याकडे केली एका निवेदनाव्दारे केली आहे, अखिल भारतीय बार परीक्षेसाठी (AIBE) खान्देश आणि उत्तर महाराष्ट्र तथा नाशिक महसूल विभागात एकही परीक्षा केंद्र नसल्यामुळे, यासह अनेक जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने नवोदित वकिलांना मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आगामी AIBE- 22 वी (29 नोव्हेंबर 2026 रोजी होणारी) परीक्षेसाठी धुळे, नंदुरबार किंवा नाशिक येथे परीक्षा केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करणारे अधिकृत निवेदन उच्च न्यायालयाचे ॲड. मनोज सूर्यवंशी यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र & गोव्याचे अध्यक्ष ॲड. जयंत जायभावे यांच्याकडे सादर केले आहे. यातबखान्देश पूर्णपणे वगळला महाराष्ट्रात केवळ अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर व इतर 2 शहरे परीक्षा केंद्र म्हणून उपलब्ध आहेत. संपूर्ण नाशिक महसूल विभाग आणि खान्देशात एकही केंद्र नाही, त्यामुळे अनेक नवोदित वकिलांना आर्थिक व शारीरिक व मानसिक त्रासाचा भार पेलावे लागत आहेत. नंदुरबार, धुळे आणि जळगाव, नाशिक व अहिल्यानगर येथील अनेक उमेदवारांना परीक्षेसाठी 140 ते 400 कि.मी.चा प्रवास करून छत्रपती संभाजीनगर, पुणे किंवा मुंबई येथे जावे लागते. यामुळे प्रवास, निवास आणि भोजनाचा मोठा खर्च नवोदित वकिलांना करावा लागतो. महिला व आदिवासी उमेदवारांचे हाल: सातपुड्याच्या दुर्गम भागातील (अक्कलकुवा, धडगाव, तळोदा) उमेदवारांना थेट वाहतूक नसल्याने केंद्रावर पोहोचणे आव्हानात्मक ठरते. तसेच महिला उमेदवारांना परक्या शहरात मुक्कामासाठी सुरक्षिततेच्या अडचणी येतात.
पायाभूत सुविधा उपलब्ध: नंदुरबार, धुळे हे खान्देशाचे मध्यवर्ती ठिकाण असून येथे विधी महाविद्यालये व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, त्यामुळे येथे केंद्र सुरू करणे सहज शक्य आहे.
नवोदित वकिलांच्या उपजीविकेशी जोडलेल्या या परीक्षेसाठी बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे तातडीने शिफारस करून खान्देशातील हजारो विधी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.



