*माजी विद्यार्थ्यांकडून रायपाटण नं. 4 शाळेला पंख्यांची भेट, मातृशाळेप्रती कृतज्ञता जपत माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माजी विद्यार्थ्यांकडून रायपाटण नं. 4 शाळेला पंख्यांची भेट, मातृशाळेप्रती कृतज्ञता जपत माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम*
*माजी विद्यार्थ्यांकडून रायपाटण नं. 4 शाळेला पंख्यांची भेट, मातृशाळेप्रती कृतज्ञता जपत माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम*
राजापूर(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपाटण नं. 4, टक्केवाडी या शाळेतील मुंबईस्थित माजी विद्यार्थी प्रवीण चंद्रकांत शेट्ये, उमेश दशरथ शेट्ये आणि अक्षय चंद्रकांत कोळवणकर यांनी आपल्या मातृशाळेप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करत 18 ऑक्टोबर 2026 रोजी शाळेला एक सिलिंग फॅन आणि एक टेबल फॅन भेटस्वरूपात दिला. शिक्षण घेतलेल्या शाळेबद्दल प्रेम आणि जिव्हाळा जपत माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या या भेटीमुळे शाळेच्या सुविधांमध्ये भर पडली आहे. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मातृशाळेच्या विकासासाठी पुढाकार घेणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. त्यांच्या या उपक्रमातून शाळा आणि माजी विद्यार्थी यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित झाले आहे. या योगदानाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांनी प्रवीण शेट्ये, उमेश शेट्ये आणि अक्षय कोळवणकर यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच भविष्यातही माजी विद्यार्थ्यांचे शाळेला असेच सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.



