*नंदुरबार जिल्ह्यात 22 ऑक्टोबर 2026 पासून रासायनिक खतांच्या विक्रीसाठी FFS प्रणाली लागू*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यात 22 ऑक्टोबर 2026 पासून रासायनिक खतांच्या विक्रीसाठी FFS प्रणाली लागू*
*नंदुरबार जिल्ह्यात 22 ऑक्टोबर 2026 पासून रासायनिक खतांच्या विक्रीसाठी FFS प्रणाली लागू*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यात 22 ऑक्टोबर 2026 पासून रासायनिक खतांच्या विक्रीसाठी FFS प्रणाली लागू.
शेतकऱ्यांना घरबसल्या खताचे बुकिंग करता येणार, उपलब्ध विक्रेत्याची निवड करून QR कोडं द्वारे मिळणार खत. नंदुरबार जिल्ह्यात 22 ऑक्टोबर 2026 पासून रासायनिक खतांच्या विक्रीसाठी लागू करण्यात येत असलेल्या Framework for Fertilizer Sale (FFS) प्रणालीच्या मुख्य उद्देश FFS प्रणालीचा वापर करण्याची पद्धत, Google Play Store वरून "Framework for Fertilizer Sale" (FFS) App डाउनलोड करावे. लॉगिन आधार (Aadhaar) आधारित किंवा Farmer ID आधारित लॉगिन करावे. शेतजमिनीची निवड: प्रणालीत दिसणाऱ्या सर्वे नंबर/शेतजमिनींपैकी ज्या जमिनीसाठी खत हवे आहे, ती निवडावी. माहिती नोंदवणे: पिकाची माहिती व आवश्यक खताचे प्रमाण नोंदवावे. विक्रेता निवडणे: आवश्यकतेनुसार खत उपलब्ध असलेल्या सोयीच्या विक्रेत्याची निवड करावी. QR Code: विक्रेता निवडल्यावर मोबाईलवर एक QR Code तयार (Generate) होईल. खत खरेदी: विक्रेत्याकडे जाऊन QR Code दाखवावा; तो स्कॅन करून नियमानुसार खत दिले जाईल, QR Code ची वैधता: मोबाईलवर तयार झालेला QR Code 72 तासांसाठी वैध राहील. त्यानंतर तो कालबाह्य (Expire) होईल व पुन्हा बुकिंग करावे लागेल. FFS प्रणालीचे प्रमुख फायदे गरजेनुसार उपलब्धता: पिकानुसार व क्षेत्रानुसार आवश्यक तेवढेच खत मिळेल. लिंकिंगला आळा: मुख्य खतासोबत इतर अनावश्यक खत खरेदी करण्याची सक्ती होणार नाही.
काळाबाजारास प्रतिबंध: अनधिकृत साठवणूक आणि कृत्रिम टंचाईवर नियंत्रण राहील.
युरियाच्या गैरवापरावर नियंत्रण: कृषी उपयोगाच्या युरियाचा औद्योगिक वापर रोखण्यास मदत होईल. बनावट खत विक्रीस बंदी: अधिकृत नोंदींमुळे बनावट किंवा डुप्लिकेट खत विक्रीला चाप बसेल. रांगा आणि गर्दीतून मुक्ती: घरबसल्या उपलब्धता पाहून बुकिंग करता येत असल्याने दुकानांसमोर रांगा लावाव्या लागणार नाहीत. शंकर किरवे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नंदुरबार व किशोर हडपे कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की 22 ऑक्टोबर 2026 पासून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खत खरेदीसाठी FFS प्रणालीचाच वापर करावा. अनधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करू नये. खताची लिंकिंग, जादा दराने विक्री किंवा काळाबाजार आढळल्यास तात्काळ प्रशासनाकडे तक्रार करावी.



