*राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026 चे पुरस्कार वितरण-सांगलीच्या मोरया गणेश मंडळाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक- हाँगकाँगच्या महाराष्ट्र मंडळाला आंतरराष्ट्रीय स्à¤
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026 चे पुरस्कार वितरण-सांगलीच्या मोरया गणेश मंडळाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक- हाँगकाँगच्या महाराष्ट्र मंडळाला आंतरराष्ट्रीय स्à¤
*राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026 चे पुरस्कार वितरण-सांगलीच्या मोरया गणेश मंडळाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक- हाँगकाँगच्या महाराष्ट्र मंडळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान-पहिला ‘वेलिंग- खातू गणेशमूर्तीकार’ पुरस्कार राजन विष्णू पाटकर यांना प्रदान- विजेत्यांचा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांच्या हस्ते सत्कार*
मुंबई(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026’ मध्ये सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी येथील मोरया गणेश मंडळाने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. नांदेड जिल्ह्यातील छत्रपती सार्वजनिक गणेश मंडळ, दिपनगरने द्वितीय, तर परभणी जिल्ह्यातील स्वराज्य गणेश मंडळ, देवनांद्राने तृतीय क्रमांक मिळविला. आंतरराष्ट्रीय स्तरावर हाँगकाँगच्या महाराष्ट्र मंडळाने, तर राष्ट्रीय स्तरावर देहरादूनच्या महाराष्ट्र समाज सेवा समितीने प्रथम क्रमांक मिळविला. यंदा प्रथमच जाहीर करण्यात आलेल्या ‘वेलिंग-खातू गणेशमूर्तीकार’ पुरस्काराचे पहिले मानकरी राजन विष्णू पाटकर ठरले. या स्पर्धेतील विजेत्या मंडळांचा पारितोषिक वितरण समारंभ 16 ऑक्टोबर रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाला. यावेळी विजेत्या मंडळांना पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
गणेशोत्सवाला जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळावी, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. गणेशोत्सवाची व्याप्ती तालुकास्तरापर्यंत वाढविण्यात आली असून, देश- विदेशातील गणेशोत्सवाच्या परंपरा, कथा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये ‘Bappa.org’ या व्यासपीठावर संकलित करण्यात येणार आहेत. युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत गणेशोत्सवाचा समावेश व्हावा, या दिशेनेही प्रयत्न करण्यात येत असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र मंडळ, हाँगकाँगने प्रथम पुरस्कार पटकावला तर टोकियो जपान मधील भारतीय वंशाचे पहिले आमदार योगेंद्र पुराणिक यांच्या 'एदोगावा इंडिया कल्चर सेंटर यांनी द्वितीय, तर हेसन इंडियन लेडीज असोसिएशन अँड पायोनिअर इंडियन्स ई.व्ही., जर्मनीने तृतीय क्रमांक मिळविला. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र समाज सेवा समिती, देहरादूनने प्रथम, श्री राम युवक मंडळ, बेळगावने द्वितीय, तर गुजरातमधील गणराया गणेश उत्सव मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. मुंबई शहर जिल्ह्यात पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाने प्रथम, श्री हनुमान सेवा मंडळाने द्वितीय, तर शिवाजी पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला. मुंबई उपनगर जिल्ह्यात स्वप्राक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, मॉडेल टाऊन, अंधेरी पश्चिमने प्रथम, बालमित्र कला मंडळ विक्रोळीचा मोरयाने द्वितीय, तर बेस्ट नगर गणेशोत्सव मंडळ, बोरिवलीने तृतीय क्रमांक मिळविला.
ठाणे जिल्ह्यात स्वराज्य पंडित नाना मित्र मंडळ, भिवंडीने प्रथम, वाशीचा चिंतामणी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने द्वितीय, तर श्री मोठा गणपती गणेशोत्सव मंडळ, मुरबाडने तृतीय क्रमांक मिळविला. पालघर जिल्ह्यात वृक्ष मित्र मंडळ, पास्थळने प्रथम, तरुण मित्र मंडळ, वाणगाव पाटील पाड्याने द्वितीय आणि श्री साईनाथ मित्र मंडळ, वसईने तृतीय क्रमांक मिळविला. रायगड जिल्ह्यात बाल मित्र मंडळ पेठेचा राजा, महाडने प्रथम, श्री युवा मित्र मंडळ कामोठ्याचा विघ्नहर्ताने द्वितीय, तर कालकाई माता क्रीडा व सामाजिक संस्था, पोलादपूरने तृतीय क्रमांक पटकावला. रत्नागिरी जिल्ह्यात युवा गणेश मित्र मंडळ, निवे बु.ने प्रथम, जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने द्वितीय, तर श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव मित्र मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सालाईवाडाने प्रथम, इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान, कसबा आचरेने द्वितीय, तर श्री नवदुर्गा सार्वजनिक गणेश मंडळ, आयीने तृतीय क्रमांक पटकावला. पुणे जिल्ह्यात पोटसुळ्या मारुती मंडळाने प्रथम, उत्कृष्ट तरुण मंडळाने द्वितीय, तर मधुबन मित्र मंडळ, पिंपरी चिंचवडने तृतीय क्रमांक मिळविला. सातारा जिल्ह्यात श्री सावळेश्वर व्यापारी गणेश उत्सव मंडळ, पुसेसावळीने प्रथम, गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्था संचालित सार्वजनिक गणेश महोत्सवाने द्वितीय, तर सार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळ, सावलीने तृतीय क्रमांक मिळविला. सांगली जिल्ह्यात मोरया गणेश मंडळाने प्रथम, तिरंगा गणेशोत्सव मंडळ, विटाने द्वितीय, तर नाथ युवा असोसिएशन, खरसुंडीने तृतीय क्रमांक मिळविला. कोल्हापूर जिल्ह्यात श्री छत्रपती व्यायाम मंडळ, इचलकरंजीने प्रथम, राजारामपुरी स्पोर्ट्स तरुण मंडळाने द्वितीय, तर श्री गणेश तरुण मंडळ, ढेंगेवाडीने तृतीय क्रमांक मिळविला. सोलापूर जिल्ह्यात श्री जगदंबा गणेशोत्सव सांस्कृतिक व सामाजिक क्रीडा मंडळाने प्रथम, जय महाराष्ट्र तरुण गणेश मित्र मंडळ, कुंभेजने द्वितीय, तर वाडीचा राजा गणेशोत्सव मंडळ, नागणेवाडीने तृतीय क्रमांक पटकावला. नाशिक जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, किल्ले कावणाईने प्रथम, वेलकम सहकार्य मित्र मंडळाने द्वितीय, तर श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट, नांदगावने तृतीय क्रमांक मिळविला. धुळे जिल्ह्यात वंदे मातरम प्रतिष्ठानने प्रथम क्रमांक मिळविला. जळगाव जिल्ह्यात जय मातृभूमी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भुसावळने प्रथम, जागृती मित्र मंडळ, भडगावने द्वितीय, तर आझाद क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ, जळगावने तृतीय क्रमांक मिळविला. नंदुरबार जिल्ह्यात श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ, तळोदाने प्रथम, तर संत शिरोमणी कबीरदास व्यायामशाळेने द्वितीय क्रमांक मिळविला. अहिल्यानगर जिल्ह्यात सुवर्णयुग तरुण मंडळ, पाथर्डीने प्रथम, शिवगर्जना प्रतिष्ठानने द्वितीय, तर ज्ञानविद्या बहुउद्देशीय संस्था, संगमनेरने तृतीय क्रमांक मिळविला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जय हिंद ग्रुप गणेश मंडळाने प्रथम, कुबेर प्रतिष्ठानने द्वितीय, तर महाराणा प्रताप गणेश मंडळ, सिल्लोडने तृतीय क्रमांक पटकावला. बीड जिल्ह्यात जय किसान गणेश मित्र मंडळ, धारूरने प्रथम क्रमांक मिळविला असून, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे निकाल प्रशासकीय कारणास्तव राखून ठेवण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यात श्री छत्रपती गणेश मंडळ, अंबडने प्रथम, तर राजे संभाजी गणेश मंडळ, परतूरने द्वितीय क्रमांक मिळविला. धाराशिव जिल्ह्यात श्री बाल हनुमान गणेश मंडळाने प्रथम, तर हंसराज गणेश मंडळ, परंडाने द्वितीय क्रमांक पटकावला. नांदेड जिल्ह्यात छत्रपती सार्वजनिक गणेश मंडळ, दिपनगरने प्रथम, श्री भक्ती गणेश मंडळ, बिलोलीने द्वितीय, तर श्री अपरंपार गणेश मंडळ, मुदखेडने तृतीय क्रमांक मिळविला. परभणी जिल्ह्यात स्वराज्य गणेश मंडळ, देवनांद्राने प्रथम, श्री रामबाग गणेश मंडळ, सेलूने द्वितीय, तर श्री पावन क्रीडा मंडळ व व्यायामशाळा, मालेगावने तृतीय क्रमांक मिळविला. हिंगोली जिल्ह्यात वृक्षगजानन गणेश मंडळ, आजेगावने प्रथम, विघ्नहर्ता गणेश मंडळ, कळमनुरीने द्वितीय, तर हिंगोलीचा राजा गणेश मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला. लातूर जिल्ह्यात स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळ, साईनगर, अहमदपूरने प्रथम, परमवीर गणेश मंडळ चॅरिटेबल ट्रस्टने द्वितीय, तर रेणा साखर गणेश मंडळ, रेणापूरने तृतीय क्रमांक पटकावला.
अमरावती जिल्ह्यात बाल गणेश मंडळ, गोपगव्हाणने प्रथम, श्री बजरंग गणेशोत्सव मंडळ, पटवीपूराने द्वितीय, तर लोकमान्य उत्सव समिती, शिंदी बु.ने तृतीय क्रमांक मिळविला. अकोला जिल्ह्यात लोकमान्य टिळक गणेश उत्सव मंडळ, पातूरने प्रथम, तर मारवाडी प्रेस गणेश उत्सव मंडळ, अकोलाने द्वितीय क्रमांक मिळविला. बुलढाणा जिल्ह्यात नवयुवक गणेश मंडळ, वरवट बकालने प्रथम, नवयुवक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, पान्हेरा खेडीने द्वितीय, तर सार्वजनिक भक्ती गणेश महिला मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला. यवतमाळ जिल्ह्यात ओंकारेश्वर गणेश मंडळ, पुसदने प्रथम, रिद्धी सिद्धी गणेश मंडळ, उमरखेडने द्वितीय, तर सार्वजनिक गणेश मंडळ, भंडारी (ज), आर्णीने तृतीय क्रमांक पटकावला. वाशिम जिल्ह्यात श्री मराठा गणेश उत्सव मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज नगर, कारंजाने प्रथम क्रमांक मिळविला.
नागपूर जिल्ह्यात सिद्धार्थ सोसायटी गणेशोत्सव मंडळ, नागपूर ग्रामीणने प्रथम, श्री सन्ती गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळ, नागपूर शहरने द्वितीय, तर नवयुवक गणेश उत्सव समिती, सावनेरने तृतीय क्रमांक मिळविला. भंडारा जिल्ह्यात प्रियदर्शनी गणेशोत्सव मंडळ व भारत सेवक शिक्षण संस्था, पवनीने प्रथम, हनुमान व्यायामशाळा गणेशोत्सव मंडळ, मोहगाव देवीने द्वितीय, तर भंडाराचा राजा प्रतिष्ठानने तृतीय क्रमांक मिळविला. चंद्रपूर जिल्ह्यात एकदंत गणेश उत्सव मंडळ, नागभीडने प्रथम, श्री बाल गणेश मंडळ, नेरीने द्वितीय, तर न्यू सन्मित्र युवक क्रीडा गणेश मंडळ, बल्लारपूरने तृतीय क्रमांक मिळविला. गडचिरोली जिल्ह्यात लोकमान्य गणेश मंडळाने प्रथम, तर श्री सार्वजनिक गणेश युवा गणेश मंडळ, एटापल्लीने द्वितीय क्रमांक मिळविला. गोंदिया जिल्ह्यात राधा कृष्ण गणेश उत्सव मंडळ, मुंडीपारने प्रथम, बाल गणेश उत्सव मंडळ, सडक अर्जुनीने द्वितीय, तर नवज्योत गणेश उत्सव मंडळ, गोंदियाने तृतीय क्रमांक मिळविला. वर्धा जिल्ह्यात बाल गणेश उत्सव मंडळ, समुद्रपूरने प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेसाठी 14 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत आयोजित निवड प्रक्रियेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील 3, राष्ट्रीय स्तरावरील 3, राज्यस्तरावरील 3, जिल्हास्तरावरील 94 आणि तालुकास्तरावरील 38 अशा एकूण 141 गणेशोत्सव मंडळांची निवड समितीने शिफारस केली होती, पहिल्या क्रमांकाच्या विजेत्या मंडळांना मंत्री ॲड.शेलार यांच्या हस्ते रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी गीतकार प्रल्हाद जाधव लिखित, गायिका संपदा माने यांनी गायिलेल्या आणि संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेल्या देवीस्तोत्र गीतांचे लोकार्पण मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, संगीतकार कौशल इनामदार, मैथिली काळे आदी उपस्थित होते.



