*जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी 17, 18, 24 व 25 ऑक्टोबरला विशेष शिबिरे जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी 17, 18, 24 व 25 ऑक्टोबरला विशेष शिबिरे जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
*जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी 17, 18, 24 व 25 ऑक्टोबरला विशेष शिबिरे जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर 17, 18, 24 आणि 25 ऑक्टोबर 2026 (शनिवार व रविवार) रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून या शिबीराचा पात्र नागरिकांनी आणि नव मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली राज्यात ‘विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम 2026’ राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, जास्तीत जास्त नागरिकांना आणि विशेषतः नव्या मतदारांना आपली नावे मतदार यादीत नोंदविण्याची सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने दावे व हरकती सादर करण्यासाठी 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदतवाढ दिली असून, अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार व नवापूर या विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक मतदान केंद्रावर 17, 18, 24 आणि 25 ऑक्टोबर 2026 (शनिवार व रविवार) रोजी विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ही शिबिरे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील. या शिबीराचा जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे वय 18 वर्षे पूर्ण झाले आहे परंतु अद्याप त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवले गेलेले नाही, अशा सर्व नव मतदारांनी या विशेष शिबिरांचा आवर्जून लाभ घ्यावा. तसेच मतदार यादीत नाव नोंदणी करणे, नाव वगळणे किंवा पत्ता बदलण्या बाबतचे दावे व हरकती अर्ज संबंधित मतदान केंद्रावर जाऊन थेट सादर करता येणार आहेत.
लोकशाहीच्या या उत्सवात जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी आणि नव मतदारांनी आपल्या जवळील मतदान केंद्रांना भेट देऊन या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपले नाव मतदार यादीत निश्चित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, डॉ. मित्ताली सेठी यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



