*अभिनव विद्यालय येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस व जागतिक हात धुवा दिन साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अभिनव विद्यालय येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस व जागतिक हात धुवा दिन साजरा*
*अभिनव विद्यालय येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस व जागतिक हात धुवा दिन साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अभिनव विद्यालय, नंदुरबार येथे देशाचे माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ.ए. पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस तसेच जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक तारकेश्वर पटेल, तर प्रमुख वक्ते म्हणून शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका अश्विनी पाटील उपस्थित होत्या. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तिलोत्तमा चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींनी कृतीयुक्त गाण्या द्वारे हात धुण्याच्या सात पायऱ्या सांगितल्या तसेच हर्षा पाटील यांनी हात धुण्याची योग्य पद्धत प्रयोगाद्वारे करून दाखवली. कार्यक्रमाच्या वक्त्यांनी आपल्या मनोगतातून डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक जाधव यांनी विद्यार्थ्यांना लेखन, वाचन कौशल्य वाढवण्यासाठी प्रोत्साहित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छते विषयी माहिती दिली तसेच नियमित वाचन करण्यासाठी आव्हान केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका तिलोत्तमा चौधरी यांनी केले.