*दुष्काळावर मात करण्यासाठी हायड्रोपोनिक चारा ठरणार वरदान, कमी पाणी, कमी जागेत वर्षभर मिळवा हिरवा चारा, बदलते हवामान, पावसाची अनिश्चितता आणि वाढती पाणीटंचाई यामुळे दुष्काळी परिस्थितीत दुभà¤
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दुष्काळावर मात करण्यासाठी हायड्रोपोनिक चारा ठरणार वरदान, कमी पाणी, कमी जागेत वर्षभर मिळवा हिरवा चारा, बदलते हवामान, पावसाची अनिश्चितता आणि वाढती पाणीटंचाई यामुळे दुष्काळी परिस्थितीत दुभà¤
*दुष्काळावर मात करण्यासाठी हायड्रोपोनिक चारा ठरणार वरदान, कमी पाणी, कमी जागेत वर्षभर मिळवा हिरवा चारा, बदलते हवामान, पावसाची अनिश्चितता आणि वाढती पाणीटंचाई यामुळे दुष्काळी परिस्थितीत दुभत्या जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध करणे हे पशुपालकांसमोरील आव्हान बनले आहे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-चाऱ्याची टंचाई आणि पशुखाद्याच्या वाढत्या किमतींमुळे दुग्धव्यवसायाच्या उत्पादन खर्चातही वाढ होत आहे. अशा परिस्थितीत कमी पाणी, कमी जागा आणि अल्प कालावधीत वर्षभर हिरवा चारा उपलब्ध करून देणारे हायड्रोपोनिक तंत्रज्ञान पशुपालकांसाठी आशादायी पर्याय ठरत आहे. मका, गहू आणि जव यांसारख्या धान्यांपासून साधारणतः 7 ते 8 दिवसांत चारा तयार करण्याच्या या आधुनिक पद्धतीमुळे चारा टंचाईच्या काळात पूरक आहाराची उपलब्धता वाढविणे शक्य होते. योग्य व्यवस्थापन आणि संतुलित पशुआहाराची सांगड घातल्यास हे तंत्रज्ञान दुग्धव्यवसायाचा खर्च नियंत्रित करण्यास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यास उपयुक्त ठरू शकते.
हायड्रोपोनिक म्हणजे मातीचा वापर न करता नियंत्रित वातावरणात पाणी आणि आवश्यक पोषक घटकांच्या साहाय्याने वनस्पती वाढविण्याचे तंत्रज्ञान. या पद्धतीमध्ये मका, जव (बार्ली), गहू आणि ओट्स यांसारख्या धान्यांची बियाणे ट्रेमध्ये पसरवून त्यांना योग्य प्रमाणात पाणी दिले जाते. नियंत्रित तापमान, आर्द्रता आणि स्वच्छतेच्या व्यवस्थापनामुळे साधारणतः 7 ते 8 दिवसांत मुळांसह, कोंबांसह आणि धान्यासह हिरव्या चाऱ्याची चटई तयार होते. हा चारा जनावरांना पूरक आहार म्हणून देता येतो. पारंपरिक पद्धतीने चारा पिकविण्यासाठी लागणारी जमीन, पाणी आणि वेळ यांची मर्यादा लक्षात घेता, कमी जागेत चारा उत्पादन करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते.
हायड्रोपोनिक पद्धतीचा प्रमुख फायदा म्हणजे कमी जागेत उभ्या मांडणीच्या रॅक आणि ट्रेच्या साहाय्याने चारा तयार करता येतो. त्यामुळे शेतात मोठ्या क्षेत्राची आवश्यकता न पडता स्वतंत्र खोलीत किंवा योग्य निवारा असलेल्या जागेत उत्पादन घेणे शक्य होते. पारंपरिक चारा उत्पादनाच्या तुलनेत या पद्धतीत पाण्याचा वापर कमी होऊ शकतो. मात्र, प्रत्यक्ष पाण्याची बचत ही उत्पादन पद्धत, हवामान, उपकरणे आणि व्यवस्थापनावर अवलंबून असते. योग्य नियोजन केल्यास वर्षभर नियमितपणे चारा तयार करता येतो. त्यामुळे चारा टंचाईच्या काळात जनावरांच्या आहाराचे नियोजन करण्यास मदत होते.हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी 1 किलो धान्यापासून (प्रामुख्याने मका) 7 ते 8 दिवसांत सुमारे 7 ते 8 किलो दर्जेदार हिरवा चारा तयार होतो. पहिल्या दिवशी उत्तम दर्जाचे मक्याचे दाणे 24 तास पाण्यात भिजत घालावेत. त्यानंतर 24 तास ते गोणपाटात बांधून मोड आणण्यासाठी ठेवावेत. दुस-या दिवशी मोड आलेले धान्य हायड्रोपोनिक ट्रेमध्ये सारख्या प्रमाणात पसरावे. त्यावर हलके पाणी शिंपडावे. साधारण 4 ते 6 व्या दिवसापर्यंत 2 ते 4 इंचांपर्यंत कोंब वाढतात व मुळांची पांढरी चटई तयार होऊ लागते. साधारण 7 किंवा 8 दिवशी 8 ते 10 इंच उंचीचा गर्द हिरवा चारा तयार होतो. जो चारा जनावरांना देण्यासाठी पूर्णपणे तयार असतो. हायड्रोपोनिक चारा हा एक उत्तम पूरक आहार आहे, परंतु तो संपूर्ण आहाराची जागा घेऊ शकत नाही. एका मोठ्या दुभत्या जनावराला दररोज अंदाजे 7 ते 10 किलो हायड्रोपोनिक चारा द्यावा. तसेच या चाऱ्यासोबत 5 ते 6 किलो सुका चारा (कडबा / पेंढा) देणे गरजेचे आहे. सुक्या चाऱ्यातील फायबरमुळे जनावरांची पचनक्रिया व्यवस्थित राहते.
महाराष्ट्रातील बदलत्या हवामानात व पाणी टंचाईच्या काळात हायड्रोपोनिक चारा तंत्रज्ञान हे दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी एक वरदान ठरत आहे. कमी संसाधनांत जास्तीत जास्त व दर्जेदार उत्पादन देण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणा-या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत हायड्रोपोनिक्स चा-याचा पुरक आहार म्हणुन वापर वाढवण्यासाठी 4 लाखांपर्यंतच्या कर्जावर 4 टक्के व्याजात सवलत दिली जाणार आहे, यामुळे कमी खर्चात शाश्वत दुग्धव्यवसाय करणे शक्य होईल.संकलन
जिल्हा माहिती कार्यालय,नंदुरबार



