*सर्व क्रीडा स्पर्धेचे आयोजन हे फक्त खाजगी अनुदानित आश्रम शाळा नांदवन येथेच का होतात?,महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान शाखा धुळे यांचा प्रश्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सर्व क्रीडा स्पर्धेचे आयोजन हे फक्त खाजगी अनुदानित आश्रम शाळा नांदवन येथेच का होतात?,महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान शाखा धुळे यांचा प्रश्न*
*सर्व क्रीडा स्पर्धेचे आयोजन हे फक्त खाजगी अनुदानित आश्रम शाळा नांदवन येथेच का होतात?,महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान शाखा धुळे यांचा प्रश्न*
साक्री(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान शाखा धुळे यांना प्रश्न पडला आहे की अनुदानित आश्रम शाळा नांदवन येथे धुळे प्रकल्प कार्यालय अंतर्गत आदिवासी समाजाच्या तालुका अंतर्गत 22 आश्रम शाळा वयोगट 11, तसेच 14 आणि 19 धरून क्रीडा स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे. आणि सन 2022-23 सन 2023-24 सन 2024-25 सन 2025-26 वरील सर्वे क्रीडा स्पर्धेचे आयोजन हे फक्त खाजगी अनुदानित आश्रम शाळा येथेच का होतात, सदर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता आदिवासीचे सर्वात जास्त क्षेत्रफळ असताना आणि वस्तीगृह आश्रम शाळा यांची उपलब्ध सर्वात जास्त आहे व शासकीय मालमत्तेची आहे तरीपण जाणून बुजून खाजगी अनुदानित आश्रम शाळा नांदवन येथे नेहमी का स्पर्धा आयोजित केले जाते यात मोठी तफावत आढळून येत आहे, कारण की साक्री तालुक्यात ज्या काही आश्रम शाळा आहेत त्यात, आश्रम शाळा रोहोड, आश्रम शाळा शेवगे, आश्रम शाळा राईनपाडा, आश्रम शाळा शिरसोले, आश्रम शाळा उंबर फाटा, आश्रम शाळा वारसा, स्वमालकीची असून मोठमोठे परिसरात खेळण्यासाठी मैदाना उपलब्ध आहेत, तरीही आदिवासी विकास विभाग जाणून बुजून रेटून फक्त अनुदानित आश्रम शाळा नांदवन येथे आयोजन का करत आहे, यामध्ये असा कोणता मासा आहे किंवा असा कोणता धनी आहे की त्याच्या सांगण्यानुसार प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व पदाधिकारी हे जाणून बुजून तीच अनुदानित आश्रम शाळा नांदवन का निवडण्यात येते याचा बोलविता धनी कोण सदर शासनाकडे शासकीय आश्रम शाळा येथे भरपूर जागा मैदानी खेळ खेळण्यासाठी उपलब्ध असताना या खाजगी शाळेचा का वापर केला जात आहे याची सखोल चौकशी व्हावी अशी आमच्या संघटने कडून विनंती आहे, अन्यथा याविरुद्ध तीव्र प्रकाराचे आंदोलन छेडण्यात येईल छेडण्यात याची प्रशासनाने दक्षता
घ्यावी, महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान शाखा धुळे जिल्हा अध्यक्ष गणेश गावित, महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान शाखा साक्री तालुका शहराध्यक्ष उदय सूर्यवंशी.



