*एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 'मेंदू आरोग्य' व मानसिक आरोग्यावर जनजागृती कार्यशाळा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 'मेंदू आरोग्य' व मानसिक आरोग्यावर जनजागृती कार्यशाळा संपन्न*
*एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 'मेंदू आरोग्य' व मानसिक आरोग्यावर जनजागृती कार्यशाळा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील एस. ए. एम. ट्रस्ट संचलित एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी, नंदुरबार जिल्हा रुग्णालय अंतर्गत मेंदू आरोग्य विभागाच्या वतीने विशेष आरोग्य तपासणी, आय.ई. सी. (IEC) सत्र आणि मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. नूतनवर्षा वळवी होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक श्री. विजय पवार, पर्यवेक्षक श्री. मनीष पाडवी आणि पर्यवेक्षिका सौ. प्रतीक्षा वळवी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा रुग्णालय अंतर्गत मेंदू आरोग्य विभागाचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रवीण डोंगरे (जिल्हा चिकित्सक मानसशास्त्रज्ञ) आणि सौ. पूजा शर्मा (समुपदेशक) यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याचे महत्त्व, दैनंदिन जीवनातील ताणतणाव व्यवस्थापन आणि आत्महत्या प्रतिबंधात्मक समुपदेशनावर सविस्तर व मोलाचे मार्गदर्शन केले. या सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंका व प्रश्नांना त्यांनी अत्यंत समर्पक व समाधानकारक उत्तरे दिली.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या सौ. नूतनवर्षा वळवी यांनी सांगितले की, "शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्यही महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा किंवा इतर कोणताही ताण न घेता सकारात्मक विचारसरणी बाळगावी."
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुनीता कुंवर यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षिका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



