*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे,अधीक्षक नियमित नियुक्ती प्रकरण योग्य निर्णय घेण्याचे आदेश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे,अधीक्षक नियमित नियुक्ती प्रकरण योग्य निर्णय घेण्याचे आदेश*
*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे,अधीक्षक नियमित नियुक्ती प्रकरण योग्य निर्णय घेण्याचे आदेश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे अधीक्षक नियमित नियुक्ती प्रकरण योग्य निर्णय घेण्याचे आदेश, याचिकाकर्ते सलोमन पणत्या गावीत, राहणार करंजी बु., तालुका नवापूर, यांनी अप्पर आयुक्त आदिवासी विकास, नासिक यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे अधीक्षक पदावर नियमित नियुक्ती आदेश मिळणे संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनावर निर्णय घेण्यासाठी रिट याचिका दाखल केली होती. याचिकाकर्ते यांची शैक्षणिक पात्रता बी.एस.डब्ल्यू. व एम. एस. डब्ल्यू. असून विशेष भरती प्रक्रियेत अधिक्षक पदासाठी अर्ज केला होता. गुणदान शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात आलेले नव्हते. भरती प्रक्रियेच्या अटी व शर्तींमध्ये वारंवार बदल करण्यात आला होता. आवश्यक कागदपत्रे ही सादर करण्यात आली होती. आवश्यक बाबींच्याही संदर्भ देण्यात आला होता. वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. परंतू कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला नव्हता. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर (न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी व न्यायमूर्ती आबासाहेब डी. शिंदे) यांनी 1 ऑक्टोबर 2026 रोजीच्या न्याय निर्णयाद्वारे प्रकरणातील सर्व बाबींच्या सखोल विचार करून अप्पर आयुक्त आदिवासी विकास, नासिक, यांनी 8 आठवड्याच्या आत निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केलेले आहेत. याचिकाकर्तेतर्फे एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन यांनी काम पाहिले.



